Source: Sakal Kolhapur
03435हातकणंगले ः येथे सकल मराठा समाजातर्फे मुक निषेध मोर्चा काढला.—–सकल मराठा समाजातर्फे कुरुंदवाडला निषेध रॅलीकुरुंदवाड ः शहरात सोमवारी (ता.४) बंद पाळला. बंदच्या पार्श्वभूमीवर सकल मराठा समाजातर्फे सकाळी मोटार सायकल रॅली काढून निषेध नोंदवला. पालिका चौकात शहर व परिसरातील सकल मराठा समाज बांधवासह बहुजन समाजबांधवांनी एकत्रित येऊन शहरातून निषेध रॅली काढून लाठी-हल्ल्याचा निषेध नोंदवला. रॅली पालिका चौकात आल्यानंतर तिचे सभेत रूपांतर झाले. यावेळी अभिजित पवार, विजय पाटील, तानाजी आलासे, माजी नगरसेवक राजू आवळे, वैभव उगळे, सर्फराज जमादार, राजमहमद बागवान, वैभव उगळे, रणजित डांगे, बाबासाहेब चौगुले, दयानंद मालवेकर, सुनील कुरुंदवाडे, महिपती बाबर, अभय पाटुकले, आण्णा चौगुले आदींनी मनोगत व्यक्त केले. व्यापाऱ्यांनी दुकाने बंद करून पाठिंबा दिला. सहाय्यक पोलिस निरीक्षक रविराज फडणीस यांनी शहरात पोलिस बंदोबस्त ठेवला होता. दरम्यान हेरवाड येथे सकल मराठा क्रांती मोर्चातर्फे रास्ता रोको आंदोलन करून लाठी हल्ल्याचा निषेध केला.
हातकणंगलेत मुक मोर्चाहातकणंगले ः येथील सकल मराठा समाजातर्फे जालना जिल्ह्यात झालेल्या लाठीमारचा निषेध करत दोषींवर कडक कारवाईचे निवेदन सोमवारी (ता. ४) हातकणंगले तहसीलदार कल्पना ढवळे यांना दिले. यावेळी पाच तिकटी येथून मूक निषेध मोर्चा काढला. दिपक कुन्नुरे, दयासागर मोरे, दिपक वाडकर, सुभाष चव्हाण, प्रकाश मोरे, राजेंद्र वाडकर, पंडित निंबाळकर, सागर लुगडे, संतोष मोरे आदी उपस्थित होते.