Source: Sakal Kolhapur
28382बालक-पालक फाउंडेशनतर्फे ‘वाचनसाखळी’कोल्हापूर : शिक्षक दिनानिमित्त बालक-पालक फाउंडेशनने विद्यार्थ्यांसाठी सुरू असलेला वाचनसाखळी प्रकल्प शिक्षकांपर्यंत पोहोचवला. कोल्हापूरसह राज्यातील १८ जिल्ह्यांतील दीडशे शिक्षकांना सहभागी करून घेण्यात आले. शिक्षक या नात्याने मुलांना शिकण्याचा अनुभव देता यावा, मुलांचा स्क्रीन टाइम कमी व्हावा, या हेतूने ‘बालक पालक’ने तयार केलेले शैक्षणिक साधन (ॲक्टिव्हिटी बुक) व गिजूभाई बधेका लिखित शोभा भागवत यांनी अनुवादित केलेले ‘दिवास्वप्न’ हे पुस्तक पोस्टाने घरपोच पाठवण्यात आले. लाभार्थीं शिक्षक याचा वापर आपापल्या पद्धतीने करणार असून, फाउंडेशनला आपला अनुभव व्हिडिओ – ऑडिओ आणि लेखी स्वरूपात देणार आहेत. त्यातील निवडक व इच्छुक शिक्षकांना सोबत घेऊन फाउंडेशन ग्रामीण भागात ‘वाचनसाखळी’ ही फिरती वाचनालये तयार करणार आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी राबविल्या जाणाऱ्या वाचनसाखळी या प्रकल्पाचे हे दुसरे वर्ष असून, त्याची माहिती फाउंडेशनच्या फेसबुक पेजवर आहे. ……..इस्कॉन मंदिरात उद्या विविध कार्यक्रमकोल्हापूर ः आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ (इस्कॉन) संस्थेतर्फे गुरुवारी (ता. ७) हरिओमनगरातील श्रीकृष्ण मंदिरात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. मंदिराच्या पटांगणात दर्शन, प्रवचन, अभिषेक, कीर्तन, महायज्ञ, नृत्यनाटिका आदी कार्यक्रम होतील. जिल्ह्यातील विविध भागांतून दहा हजारांहून अधिक भाविक येथे येणार असून, त्यांना महाप्रसादाचे वितरण केले जाणार आहे.