Source: Sakal Kolhapur
श्रीपतरावदादा बँकेला तीन कोटी ३८ लाख नफाकुडित्रे, ता. ३ : श्रीपतराव दादा सहकारी बँकेला आर्थिक वर्षात तीन कोटी ३८ लाख रुपये नफा झाला असून बँकेने विविध योजना प्रभावीपणे राबवल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष राजेश पी. पाटील-सडोलीकर यांनी दिली.बँकेने स्थापणेपासूनच आमदार पी. एन. पाटील-सडोलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली समाजातील विविध गरजू घटकांना मदतीचा हात दिला आहे. बँकेच्या मुख्य कार्यालय व सात शाखा असून ९० कोटी रुपयांच्या ठेवी व ५८ कोटी ७० लाख रुपयांची कर्जे वाटप केले आहेत. एन. पी.ए. शून्य टक्के असून नेटवर्थ अकरा कोटी रुपयांचे आहे.बँकेने आण्णासाहेब पाटील महामंडळाच्या अंतर्गत कर्ज योजना राबवून तरुणांना पाठबळ देण्याचे काम केले आहे. त्याचबरोबर लघु उद्योगापासून मोठ्या उद्योगापर्यंत, विविध घरगुती बाबीसाठी कर्ज योजना राबवून शेतकरी व अन्य घटकांना आर्थिक मार्ग उपलब्ध करून दिला आहे.’’ या वेळी बँकेचे संस्थापक आमदार पी. एन. पाटील-सडोलीकर, उपाध्यक्ष गणपतराव पाटील, संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी एस. बी. दिंडे उपस्थित होते.