Source: Sakal Kolhapur
gad53.jpg : 28274महारुद्र हुक्केरी, सदाशिव कापसे, साधना कुंभार
शैक्षणिक व्यासपिठाचे पुरस्कार जाहीरगडहिंग्लज, ता. 5 : येथील प्राथमिक शिक्षक समिती पुरस्कृत डॉ. जे. पी. नाईक शैक्षणिक व्यासपीठातर्फे यंदाचे आदर्श शिक्षक पुरस्कार व समितीरत्न पुरस्कार जाहीर केले. व्यासपीठातर्फे दरवर्षी शैक्षणिक, सामाजिक, संघटनात्मक क्षेत्रात काम करणाऱ्या शिक्षकांना या पुरस्काराने गौरवण्यात येते. महारुद्र हुक्केरी (विद्या मंदिर जरळी), सदाशिव कापसे (विद्या मंदिर हसुरचंपू), वैशाली कोरवी (केंद्रशाळा नूल), नामदेव पाटील (विद्या मंदिर करंबळी), साधना कुंभार (विद्या मंदिर सावतवाडी तर्फ नेसरी) यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. संघटनात्मक कामाबद्दल राजाराम नाईक, शामराव माळकरी, भास्कर पाटील, भरत पाटील यांना समितीरत्न पुरस्काराने गौरवले जाणार आहे. सतीश तेली, रवळू पाटील, संजय चाळक, चंद्रकांत जोशी, रामचंद्र सिताप, श्रीधर पाटील, तुकाराम जाधव यांच्या निवड समितीने या पुस्कारांसाठी शिक्षकांची निवड केली आहे.—————————-बी. लिब. प्रवेशासाठी मुदतवाढगडहिंग्लज : येथील डॉ. घाळी महाविद्यालयात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाशी सलग्न व युजीसीच्या मान्यतेने ग्रंथालय आणि माहितीशास्त्र (बी. लिब.) शिक्षणक्रम सुरु आहे. या शिक्षणक्रमाला प्रवेश घेण्याची मुदत संपली होती. मात्र, प्रवेशाची मुदत १० सप्टेंबरपर्यंत वाढवलेली आहे. कोणत्याही विषयातील पदवी परीक्षा ५० टक्के गुणासह उत्तीर्ण असलेल्यांना या शिक्षणक्रमाला प्रवेश घेता येईल. इच्छूकांनी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.