शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी विद्यापीठे-शिक्षण विभागाने एकत्रित काम करावे

Facebook
LinkedIn
WhatsApp

Source: Sakal Kolhapur

फोटो-00102……..

विद्यापीठे- शिक्षण विभागाने एकत्रित काम करावे

पालकमंत्री दीपक केसरकरः शिवाजी विद्यापीठात आभासी वास्तविकता तंत्रज्ञान प्रणालीचे उद्घाटन

कोल्हापूर, ता. २ : ‘आभासी वास्तविकता तंत्रज्ञान प्रणालीचा अवलंब करून शालेय शैक्षणिक संकल्पनांचे सुलभीकरण करण्यासाठी शिवाजी विद्यापीठाने विशेष अॅप विकसित करून शालेय शिक्षण क्षेत्रामध्ये महत्त्वाचे योगदान दिले आहे. त्यामुळे येथून पुढच्या काळात शैक्षणिक गुणवत्ता वृद्धीसाठी विद्यापीठे आणि शालेय शिक्षण विभाग यांनी एकत्रित काम केल्यास अधिकाधिक शैक्षणिक विकास साधणे शक्य होईल’, असे प्रतिपादन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सोमवारी येथे केले. विद्यापीठाने विकसित केलेल्या ‘शालेय शिक्षणात आभासी वास्तविकता तंत्रज्ञान प्रणाली’च्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. व्यवस्थापन परिषद सभागृहातील या कार्यक्रमास कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, जिल्हाधिकारी राहुल रेखावार उपस्थित होते. पालकमंत्री केसरकर म्हणाले, ‘आभासी वास्तविकता तंत्रज्ञान प्रणाली महाराष्ट्रातील विदर्भासह सर्व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्याचा मनोदय आहे. शैक्षणिक गुणवत्ता ही उत्तम मार्गदर्शनातूनच येईल. त्यासाठी भाषा, विज्ञान व गणित या विषयांमध्ये त्याला रुची निर्माण व्हावी, या दिशेने काम करण्याची आवश्यकता आहे. विद्यापीठाने निर्माण केलेल्या या आधुनिक प्रणालीमुळे विद्यार्थ्यांच्या विज्ञानविषयक संकल्पना अधिक सुस्पष्ट होऊन त्यांना त्यात रुची निर्माण होईल. त्यातून केंद्रीय स्पर्धा परीक्षांमध्येही ते यशस्वी होतील.’कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, ‘कोल्हापूर जिल्हा प्रशासनाच्या सहकार्यातून विकसित करण्यात आलेल्या या प्रणालीमध्ये सध्या भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र या तीन विषयांच्या १०४ संकल्पनांचे आधुनिक आभासी वास्तविकता तंत्रज्ञानाच्या आधारे सुलभीकरण करण्यात आले आहे. विज्ञानातील अवघड व क्लिष्ट संकल्पना विद्यार्थ्यांना समजण्यास त्यामुळे सोपे होणार आहे. ही प्रणाली प्रशासनाच्या सहकार्याने जिल्ह्यातील सर्व शासकीय शाळांमधील आठवी, नववी, दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे.’ या कार्यक्रमात डॉ. सुधीर देसाई, वैशाली भोसले यांनी या आभासी वास्तविकता तंत्रज्ञान प्रणालीचे सादरीकरण केले. प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांनी प्रास्ताविक केले. कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी आभार मानले. ….

प्रणालीची सुरूवात होतअसल्याचा मनस्वी आनंद

शालेय शिक्षणात आभासी वास्तविकता तंत्रज्ञान प्रणालीसाठी तत्कालीन पालकमंत्री आमदार सतेज पाटील यांनी ७५.४० लाखांचा निधी जिल्हा नियोजन मंडळाच्या नाविण्यपूर्ण योजनेतून उपलब्ध करून दिला. दरम्यान, या प्रणालीमुळे शासकीय शाळेत शिकणाऱ्या इयत्ता आठवी,नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना उपयोग होणार आहे. ही प्रणाली प्रत्यक्षात साकारत असल्याचा मनस्वी आनंद होत आहे. शालेय विद्यार्थ्यांसह इतर क्षेत्रांमध्ये देखील याचा वापर होईल अशी खात्री वाटत असल्याची प्रतिक्रिया आमदार पाटील यांनी व्यक्त केली.

Marathi News
LATEST
>>कोल्हापूर : वेतवडे येथे धामणी नदीत बुडून १३ वर्षीय मुलाचा मृत्यू>>कांदा झाला स्वस्त>>पेठवडगाव: अपघात जोड>>पोलीस कोठडी>>पिवळे सोने झाले मातीमोल>>युथ समिट ऑफ समर अधिवेशन>>सीपीआर रक्षकावर हल्ला गुन्हा दाखल>>Kolhapur : हत्तीवरून मिरवणुकीने कन्याजन्माचे स्वागत; पाटील कुटुंबीयांचा आदर्श उपक्रम>>लॉरी ऑपरेटर्स हेल्मेट>>नेते, संचालक भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या पाठीशी>>मुश्रीफ कार्यक्रम>>नागोजीराव पाटणकर हायस्कूल बातमी>>ओबीसी आरक्षण वाढवण्याचा निर्णय चुकीचा ः ॲड.इंदुलकर>>‘आरसीसी-एसईटी’साठी रविवारी स्कॉलरशिप परीक्षा>>भाजप कार्यालय प्रवेश>>जंगम समाज संस्कार शिबीर>>मराठा महासंघ मेळावा>>झूम प्रकल्प पाहणी>>सौंदाळेच्या तरुणाचा दुचाकी अपघातात मृत्यू>>प्रकाशन
Browse by category:

Kolhapur

Maharashtra

National

International

Entertainment

Sports

Health

Lifestyle

Browse by brands: