Source: Sakal Kolhapur
02317हुपरी: शेतीचे वीज वेळापत्रक बदलण्याच्या मागणीसाठी महावितरण कार्यालयासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली.————–शेतीचे वीज वेळापत्रक बदलासाठी ‘स्वाभिमानी’ आक्रमकहुपरीमध्ये भर उन्हात निदर्शने, ठिय्या; आश्वासनानंतर आंदोलन मागेहुपरी, ता.२: तीन महिन्यांपासून असलेले शेतीसाठीचे वीज वेळापत्रक गैरसोयीचे ठरत आहे. त्यामुळे शेतीसाठी पाणी देणे तसेच जनावरांसाठी पाणीसाठा करून ठेवणे अडचणीचे झाले आहे. त्यामुळे वीज वेळापत्रक बदलावे या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे आज येथे महावितरण कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली. संतप्त शेतकऱ्यांनी रखरखत्या उन्हात दोन तास ठिय्या आंदोलन केले. आंदोलकांचा रुद्रावतार पाहून वीज अधिकाऱ्यांनीही भर उन्हात बसुन त्यांचे गाऱ्हाणे ऐकुन घेतले. आश्वासनानंतर आंदोलन मागे घेतले.सकाळी अकराच्या सुमारास महावितरण कार्यालयासमोर एकत्र येत संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. भर उन्हातच ठिय्या मांडला. वीज अभियंता एस. डी. मंगसुळे यांनी आंदोलकांना कार्यालयात येण्याचे आवाहन केले. मात्र त्यास नकार देत मागणी मान्य झाल्याशिवाय जागेवरून न उठण्याचा निर्धार केला. त्यामुळे अभियंता श्री. मंगसुळे व श्री. कसबे यांनी आंदोलकांशी उन्हात बसुन चर्चा केली. रात्री नऊ ते पहाटे पाचऐवजी रात्री अकरा ते सकाळी सात या वेळेत वीज पुरवठा करण्याची मागणी करून निवेदन सादर केले. मागणीसंदर्भात वरिष्ठ अधिकारी पातळीवर ऑनलाईन पद्धतीने तत्काळ कार्यवाही करण्याचे आश्वासन अभियंता श्री. मंगसुळे व श्री. कसबे यांनी दिले. आंदोलनात तालुका अध्यक्ष राजाराम देसाई, सूर्यकांत पाटील, शहराध्यक्ष अशोक बल्लोळे, प्रभाकर इंग्रोळे, विवेक रायबागकर, हनुमंत आपटे, घनश्याम गायकवाड, चंद्रकांत ठोंबरे, राजेंद्र बेडगे आदी सहभागी झाले होते.””””””””* कोट:रात्री नऊ ते पहाटे पाच ही वेळ रात्रकाळातच सरली जाते. अंधारामुळे पुरेशा प्रमाणात शेतीला पाणी देता येत नाही. परिणामी पिकांच्या वाढीवर होत असून पाण्या अभावी पीके करपली जाऊ लागली आहेत. जनावरांनाही पिण्यासाठी पाणी साठवून ठेवता येत नाही. वेळेत बदल झाल्यास सकाळी सात दरम्यानची वेळ शेतकऱ्यांना सोयीची होईल. -राजाराम देसाई, तालुकाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना