Source: Sakal Kolhapur
chd41.jpg 00523बागीलगे ः ग्रामपंचायतीची इमारत.
बागीलगेतील शेतकरी महिलांना मिळणार हक्काची आठवडा सुटीग्रामपंचायतीचा निर्णय ः आजपासून अंमल, दर शुक्रवारी शेतीच्या कामातून विश्रांती
सुनील कोंडुसकर ः सकाळ वृत्तसेवाचंदगड, ता. ४ ः बागीलगे (ता. चंदगड) येथील ग्रामपंचायतीने गावातील शेतकरी महिलांसाठी दर शुक्रवारी हक्काची आठवडा सुटी जाहीर केली आहे. उद्या (ता. 5)पासून त्याचा अंमल सुरु होत आहे. सुटीदिवशी महिलांनी शेतात जायचे नाही. नियमित घरकाम वगळता विश्रांती घ्यायची आहे. ग्रामपंचायतीच्या या निर्णयाचे महिलावर्गातून स्वागत होत आहे. बागीलगे हे २२०० लोकवस्तीचे गाव. महिलांचे प्रमाण पन्नास टक्के. येथील अनेकजण विविध क्षेत्रात देशात आणि परदेशात कार्यरत आहेत. परंतु, शेतीची नाळही तुटू दिलेली नाही. प्रयोगशील गाव म्हणूनही त्याची ख्याती आहे. पुरुषांच्या बरोबरीने महिला शेतात काबाडकष्ट करतात. घरकाम सांभाळून त्यांना शेतात राबावे लागते. शेती कामातून सण, उत्सव वगळता हक्काची सुटी मिळत नाही. उलट या दिवशी सणाच्या कामाचा ताण असतो. नोकरदारांप्रमाणे शेतकऱ्यांना आठवड्याची सुटी मिळत नाही. त्यातही महिलांचा तर विचारच होत नाही. गावचे सुपुत्र राज्य कर निरीक्षक गोपाळ पाटील यांनी अनेक महत्वाकांक्षी निर्णयांना सुरवात केली आहे. ग्रामस्थांचा त्यांना प्रतिसाद आहे. त्यांच्याच मार्गदर्शनाने सरपंच नरसू पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत उपसरपंच अनुसया पाटील, श्वेता पाटील, पुंडलिक पाटील, परशराम सुतार, माया पाटील, संपदा गुरव आदींनी महिलांसाठी आठवडा सुटीचा निर्णय घेतला. त्याशिवाय महिलांना वाकळा (कवंद) धुण्यासाठी गावालगतच धोबी घाट बांधण्याचा तसेच सासू- सुनेमधील नातेसंबंध अधिक दृढ व जिव्हाळ्याचे व्हावेत म्हणून दर महिन्याला अनुभवी तज्ज्ञांचे मार्गदर्शनपर कार्यक्रम घेण्याचाही निर्णय घेतला आहे.
चौकटसाऊंड सिस्टीम गावातून हद्दपारडॉल्बीचे दुष्परीणाम पाहता गावात साऊंड सिस्टीम लावणाऱ्याला २५ हजार रुपयांचा दंड करण्याचा निर्णय झाला. सनई-ताशा, बेंजो, बॅंड यासारख्या पारंपरिक संगीताच्या तालावर वरात काढण्याला काहीच हरकत नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले.
कोटपहाटे उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत महिलांच्या कामाचे मोजमाप करायचे झाल्यास दिवसाचे सुमारे बारा ते चौदा तास त्या काम करतात. या धबडग्यातून त्यांच्या शरीराला विश्रांती मिळावी हा हेतू ठेवून हा निर्णय घेतला आहे.-नरसू पाटील, सरपंच-अनुसया पाटील, उपसरपंच