Source: Sakal Kolhapur
gad45.jpg00543गडहिंग्लज : शिवराज महाविद्यालयात प्रा. किसनराव कुराडे यांचा राजेश पाटील यांच्या हस्ते सत्कार झाला. डॉ. एस. एम. कदम, डॉ. अनिल कुराडे, बसवराज आजरी उपस्थित होते.————————-‘शिवराज’ नावारुपाला आणण्यात कुराडेंचे योगदानआमदार राजेश पाटील : नॅकचा ”ए” ग्रेड मिळाल्याबद्दल सत्कारसकाळ वृत्तसेवागडहिंग्लज, ता. ४ : शिवराज महाविद्यालय नावारुपाला आणण्यात प्रा. किसनराव कुराडे यांचे मोलाचे योगदान आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिवराजची अभिमानास्पद वाटचाल सुरु आहे. महाविद्यालयाला नॅकचा ए ग्रेड मिळण्यात त्यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले आहे. म्हणूनच त्यांच्या कार्याचा सन्मान होत आहे, असे प्रतिपादन आमदार राजेश पाटील यांनी केले.येथील शिवराज महाविद्यालयाला नॅकचा ए ग्रेड मिळाल्याबद्दल महाविद्यालयाचे विविध विभाग, संस्था व मान्यवरांतर्फे संस्थेचे अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे यांचा सत्कार केला. यावेळी श्री. पाटील बोलत होते. प्राचार्य डॉ. एस. एम. कदम अध्यक्षस्थानी होते. माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.श्री. चव्हाण यांनी अनेक विद्यार्थ्यांना घडविणाऱ्या या महाविद्यालयाचे विद्यार्थी भवन निर्माण व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली. प्रा. कुराडे यांनी संस्थेची व्याप्ती वाढवणार असून स्वायत्त विद्यापीठ करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. माजी विद्यार्थी संघटनेचे बसवराज आजरी, संस्थेचे सचिव डॉ. अनिल कुराडे, माधव पोटे-पाटील, कोजिमाशिचे संचालक सचिन शिंदे, डॉ. कदम, ‘नॅक’चे समन्वयक प्रा. किशोर अदाटे, प्रा. आझाद पटेल यांची भाषणे झाली. फार्मसीचे प्राचार्य राहुल जाधव, प्रा. बिना कुराडे, शेखर येरटे, आर. एस. पाटील, रमेश रिंगणे आदी उपस्थित होते. पदव्युत्तर विभाग प्रमुख डॉ. सुधीर मुंज यांनी स्वागत केले. डॉ. श्रद्धा पाटील यांनी सूत्रसंचालन केले.