Source: Sakal Kolhapur
GAD24.JPG99953गडहिंग्लज : नॅकचे ”ए” मानांकन मिळाल्याबद्दल निघालेल्या मिरवणुकीत सचिव डॉ. अनिल कुराडे यांना उचलून घेत शिवराजच्या कर्मचार्यांनी आनंदोत्सव साजरा केला.—————————————————————‘शिवराज’ला नॅकचे ‘ए’ मानांकनगुलालाच्या उधळणीत मिरवणुकीने आनंदोत्सवसकाळ वृत्तसेवागडहिंग्लज, ता. २ : येथील शिवराज महाविद्यालयाला बंगळूरच्या नॅक समितीने ‘ए’ मानांकन देवून गौरवले. यशाबद्दल महाविद्यालयाचे शिक्षक, विद्यार्थी, कर्मचाऱ्यांनी शहरातून गुलालाच्या उधळणीत मिरवणूक काढून आनंदोत्सव साजरा केला. दरम्यान, मानांकन मिळाल्याचे वृत्त समजताच दसरा चौकात महाविद्यालयातर्फे पेढे वाटप व फटाक्यांची आतषबाजी केली.संस्थेचे सचिव डॉ. अनिल कुराडे, उपाध्यक्ष जे. वाय. बारदेस्कर, के. जी. पाटील, अॅड. दिग्विजय कुराडे, नारायणराव कुराडे, बसवराज आजरी आदी उपस्थित होते. डॉ. कुराडे म्हणाले, ‘शिवराजला मिळालेले हे अभूतपूर्व व अभिमानास्पद आहे. त्यासाठी अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे यांचे मार्गदर्शन व सर्व घटकांचे सहकार्य मिळाले. हे सहकार्य कदापी विसरू शकत नाही.’ प्राचार्य डॉ. एस. एम. कदम, नॅकचे समन्वयक प्रा. किशोर अदाटे, ग्रंथपाल संदीप कुराडे यांची भाषणे झाली. दरम्यान, संस्थेचे पदाधिकारी खुल्या जीपमध्ये विराजमान होत महाविद्यालयाच्या आवारातून वाद्यांच्या गजरात मिरवणूक सुरु झाली. मुख्य रस्ता, बाजारपेठ, शिवाजी चौक ते दसरा चौक, चर्च रोडमार्गे महाविद्यालयात मिरवणुकीची सांगता झाली. शिवराज कॉलेजचा विजय असो अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. महात्मा बसवेश्वर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. डॉ. सुधीर मुंज, डॉ. ए. एम. हसूरे, प्रा. बिनादेवी कुराडे, ग्रंथपाल संदीप कुराडे, पर्यवेक्षक प्रा. तानाजी चौगुले आदी सहभागी झाले होते.