Source: Sakal Kolhapur
99879शिरोळ ः नगर परिषदेला प्राप्त झालेल्या वाहनांचे पूजन सुहास गाडे, अमरसिंह पाटील आदिंनी केले.——–शिरोळमधील स्वच्छता मोहिमेस वेगसुहास गाडे; शासनाकडून ४४ लाखांचा निधी उपलब्धशिरोळ, ता. २ ः शहरातील कचरा उठाव आणि स्वच्छता मोहिमेसाठी शासनाकडून ४४ लाखांचा निधी उपलब्ध झाला आहे. यातून ट्रॅक्टर, हातगाडी, बेलिंग मशीन उपलब्ध झाल्यामुळे शहरातील स्वच्छता मोहिमेस वेग येईल, असा विश्वास प्रशिक्षणार्थी मुख्याधिकारी सुहास गाडे यांनी व्यक्त केला.शिरोळ नगर परिषदेस स्वच्छ भारत अभियान (नागरी) १.० अंतर्गत ४४ लाखांचा निधी मंजूर झाला. यामध्ये २५ हातगाडी, २ लहान ट्रॅक्टर व १ बेलिंग मशीन, ४ घंटागाडी अशी वाहने व यंत्रसामुग्री नगर विकास खात्यामार्फत प्राप्त झाली आहेत. त्याचे पूजन श्री. गाडे व नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांच्याहस्ते केले. नगरसेवक राजाराम कोळी, प्रा आण्णासाहेब माने गावडे, एन. वाय. जाधव, अमरसिंह शिंदे, दयानंद जाधव, आण्णासो पुजारी पालिकेचे पाणीपुरवठा व स्वच्छता अभियंता अमन मोमीन, शहर समन्वयक साहिल मकानदार आदी उपस्थित होते.फोटो ओळ
फोटो ich-shi245jpg ने पाठविला आहे