Source: Sakal Kolhapur
05067शिरोली पुलाची : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समस्या समाधान शिबीरप्रसंगी सरपंच पद्मजा करपे, सुजाता पाटील, हर्षदा यादव, निवास गावडे आदी.
शिरोलीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरस्त्री शक्ती समस्या समाधान शिबीरशिरोली पुलाची : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समस्या समाधान शिबीरामधून महिलांना शासनाच्या विविध विभागातील योजनांची माहिती मिळत आहे, तसेच महिलांच्या समस्यांचे निराकरण होत आहे. त्यामुळे हे शिबिर महिलांच्यासाठी उपयुक्त ठरत असल्याचे मत सरपंच पद्मजा करपे यांनी व्यक्त केले. महावितरणच्या कोल्हापूर मार्केट यार्ड उपविभागीय कार्यालयातर्फे येथील ग्रामपंचायतीमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समस्या समाधान शिबीराचे आयोजन केले होते. याप्रसंगी त्या अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या. महावितरणचे शाखा अधिकारी निवास गावडे व अमीर मनेर प्रमुख उपस्थित होते. या वेळी महावितरणच्या महिला कर्मचाऱ्यांनी विज बिल वाचन, विजेची बचत, ऑनलाइन पद्धतीने पेमेंट करणे, महावितरणची टेक्नॉलॉजी आत्मसात करणे, वीज बिलावरील नावात बदल करणे, नवीन वीज जोडणी पद्धती, विजेची बचत, तसेच विद्युत उपकरणांची हाताळणी याविषयी मार्गदर्शन केले. तसेच महिलांनी उपस्थित केलेल्या वीज बिला संदर्भातील विविध तक्रारीचे निरसन केले. या वेळी ग्रामपंचायत सदस्य सुजाता पाटील, हर्षदा यादव, बिलिंग अधिकारी सौ. जाधव आदी उपस्थित होते.