fbpx
Site logo

शिक्षकांच्या रोश्‍‍टर दुरुस्‍तीची पडताळणी

Facebook
LinkedIn
WhatsApp

Source: Sakal Kolhapur

जिल्‍हा परिषद … लोगो…शिक्षकांच्या रोश्‍‍टर दुरुस्‍तीची पडताळणी

कोल्‍हापूर, ता.५: जिल्‍हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडील ६५०० शिक्षकांच्या रोश्‍‍टर तपासणीचे काम अंतिम टप्‍प्यात आहे. यातील सुमारे ३०० शिक्षकांच्या रोश्‍‍टरमध्ये त्रुटी आढळल्या होत्या. त्या दुरुस्‍त करुन मंगळवारी (ता.५) पुणे आयुक्‍त कार्यालयातील सहाय्‍यक आयुक्‍त मागासवर्ग कक्ष यांच्याकडे सादर करण्यात आल्या. यामुळे शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा होणार आहे.

शासकीय कर्मचाऱ्यां‍चे दरवर्षी रोश्‍‍टर तपासणी केले जाते. यात कर्मचाऱ्या‍च्या नियुक्तीचे आदेश, वेतनश्रेणी, जात वैधता प्रमाणपत्र याची कागदपत्रे सादर करणे आवश्यक असते. मात्र ३०० शिक्षकांच्या रोश्‍‍टरमध्ये यातील काही कागदपत्रे उपलब्‍ध झाली नव्‍हती. त्यामुळे हे प्रस्‍ताव शिक्षण विभागाकडे परत पाठवण्यात आले होते. या प्रस्‍तावात असणाऱ्या‍ त्रुटी दूर करण्यासाठी गेले काही दिवस शिक्षकांनी जिल्‍हा परिषदेत तळ ठोकला होता. या सर्व कागदपत्रांची पूर्तता आता करण्यात आली आहे. जिल्‍हा परिषद स्‍तरावर कागदपत्रांची छाननी करुन आता ही कागदपत्रे सहाय्‍यक आयुक्‍तांकडे सादर करण्यात आली आहेत.

रोश्‍‍टर तपासणीनंतर शिक्षकांच्या रिक्‍त जागा, या जागांची वर्गवारी उपलब्‍ध होणार आहे .या माहितीमुळे शिक्षक नोकर भरतीसाठीची प्रक्रिया सुलभ होणार आहे. त्यामुळेच शिक्षकांसह संघटनांनी मोठ्या प्रयत्‍नाने रोश्‍‍टर दुरुस्‍तीची प्रक्रिया पार पाडली आहे.

Marathi News
[pj-news-ticker]
Browse by category:

Kolhapur

Maharashtra

National

International

Entertainment

Sports

Health

Lifestyle

Browse by brands: