Source: Sakal Kolhapur
शाळांमध्ये शनिवारी होणार गुणपत्रिकांचे वाटप
कोल्हापूर ः राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी वर्षाची सांगता शनिवारी (ता. ६ मे) होणार आहे. त्यादिवशी शाळांनी शैक्षणिक वर्ष सन २०२२-२३ चा निकाल जाहीर करावा. विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणपत्रिकांचे वाटप करावे, अशी सूचना प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे संचालक शरद गोसावी यांनी केली आहे. या स्मृती शताब्दी वर्ष सांगतानिमित्त शाळांमध्ये उपक्रम, कार्यक्रमांचे आयोजन करावे. दरवर्षीप्रमाणे उद्या, सोमवारी महाराष्ट्र दिन साजरा करावा. शासन निर्णय आणि संचालनालयाच्या सूचनेनुसार शाळांच्या उन्हाळी सुटी व नवे शैक्षणिक वर्ष सुरू करण्याच्या यापूर्वी जाहीर केलेल्या तारखांमध्ये कोणताही बदल केला नसल्याचे गोसावी यांनी परिपत्रकाद्वारे कळविले.