व्हीआयपी दर्शनाविरोधात दिवाणी न्यायालयात धाव

Share on facebook
Facebook
Share on linkedin
LinkedIn
Share on whatsapp
WhatsApp

Source: Sakal Kolhapur

‘पेड’ दर्शन रांगेविरुद्धदिवाणी न्यायालयात दावागजानन मुनीश्‍वर; आज सुनावणीसकाळ वृत्तसेवा कोल्हापूर, ता. २२ ः यंदाच्या नवरात्रोत्सवात देवस्थान समितीने दोनशे रुपये आकारून वेगळी व्हीआयपी दर्शन रांग करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याविरोधात आज श्रीपूजक गजानन मुनीश्वर यांनी दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला आहे. याबाबत उद्या (शुक्रवारी) न्यायालयात सुनावणी होणार आहे.जिल्हा पोलिस अधीक्षक, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती, जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या विरोधात दावा दाखल केला असून, न्यायालयाने कारणे दाखवा नोटीस काढली असल्याचे श्री. मुनीश्वर यांनी सांगितले. अंबाबाई मंदिरामध्ये महाराष्ट्र सरकारने देवीच्या दर्शनासाठी कोणत्याही देवस्थानने भाविकांसाठी नियमित रांगेव्यतिरिक्त अन्य कोणत्याही मार्गाने दर्शन घेण्यास परवानगी घेण्यात येऊ नये व तशी कोणतीही स्वतंत्र व्यवस्था करण्यात येऊ नये. कोणत्याही मार्गाने रक्कम आकारून दर्शनासाठी प्रवेश देऊ नये. दर्शनासाठी पासेस किंवा प्रवेशपत्रिका वितरित करू नये, अशा प्रकारच्या मार्गदर्शक सूचना सात सप्टेंबर २०१० ला जाहीर केल्या होत्या. या मार्गदर्शक सूचना अंमलात आणण्यासाठी (रे. क. नं. ७२२-२०१० चा) दावा दाखल केला होता. तो १५ ऑक्टोबर २०१० रोजी मंजूर होऊन शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांव्यतिरिक्त अन्य कोणत्याही मार्गाने कोणालाही दर्शन देऊ नये म्हणून मनाई केली आहे. याबाबतचे पत्र देऊनही त्याचा विचार झाला नाही. त्या उलट पत्रकार परिषद घेऊन व्हीआयपी दर्शनाचा निर्णय जाहीर करून न्यायालयाचा अवमान झाला आहे. त्यामुळे दावा दाखल केला असल्याचेही श्री. मुनीश्वर यांनी सांगितले.

eZy News
LATEST
>>गुंडाचा डोक्यात दगड घालून खून>>आजरा येथे जुगार आड्यावर छापा.>>झुलन गोस्वामीची अखेरची लढत>>Lumpy skin disease : लम्पी स्कीनप्रकरणी उच्च न्यायालयात जनहित याचिका>>कागल : राष्ट्रवादी पक्षाची विजयाची नांदी – आमदार हसन मुश्रीफ>>चंदगडी हिसका दाखवू>>शिराळा : विश्वास कारखाना वार्षिक सभा>>राक्षीतील घरफोड्याला अटक; वाघबीळ घाटात कारवाई, घरफोडीतील सोन्या-चांंदीचे दागिने जप्त>>शिक्षणाचा खेळखंडोबा होऊ देणार नाही – मंत्री केसरकर>>गांधी समजून घेताना>>कोल्हापूरला जयपूर करू -नुतन पालकमंत्री दीपक केसरकर>>म.ह. शिंदे महाविद्यालय>>जातिविहीन व्हा, उच्चनिचतेच्या भिंती जमीनदोस्त करा”>>अन्नपुर्णा’ शुगरचा सोमवारी द्वितीय गळीत हंगाम शुभारंभ>>‘सीबीआय’ कडून कागलमधील तरुणाची चौकशी>>लम्पी>>लव्हटे परिसंवाद>>कोजिमाशिची आज वार्षिक सभा>>नवरात्रोत्सव>>६५ हजारांचे दागिने जप्त
Browse by category:

Kolhapur

Maharashtra

National

International

Entertainment

Sports

Health

Lifestyle

Browse by brands: