fbpx
Site logo

वेळेवर येण्यावरून दोन दादांमध्ये जुंपली; पवार-पाटील यांच्यात धुसफूस

Facebook
LinkedIn
WhatsApp
उपमुख्यमंत्री अजित पवार, चंद्रकांत पाटील यांच्यात धुसफूस

Source: Lokmat National

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे :  उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यात धुसफूस सुरू असतानाच शनिवारी एका कार्यक्रमात दोघांमध्ये वेळेवर येण्यावरून चांगलीच जुंपली. जिल्हा परिषदेने जिल्हा शिक्षक पुरस्कार आणि अध्यक्ष चषक पुरस्कार व शिष्यवृत्ती परीक्षा राज्य गुणवत्ता यादीतील विद्यार्थी, शिक्षक पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यासाठी दोघांना निमंत्रित केले होते. 

‘आता कपाळ फोडायचं का’ nइयत्ता ८ वी शिष्यवृत्तीत बारामतीचा निकाल शून्य टक्के लागला आहे. त्यावर अजित पवार म्हणाले, की आम्ही मर, मर सहा वाजल्यापासून कामाला सुरुवात करतो; परंतु निकाल शून्य टक्के लागत असतील तर आता कपाळ फोडायचं का? आमची लोकं काय करतात?n“ओरखडा न येऊ देता चिमटा काढायचा, असा अजित पवारांचा स्वभाव आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी त्यांच्या सूचनेचं पालन करावं. पुढच्या काळात काय केलं पाहिजे, हे दादांनी सांगितले आहे तेच मलापण सांगायचं आहे. अजित पवारांच्या भाषणाला मम म्हणतो”, असे पाटील म्हणाले.

आरोग्याचे दिले सल्लेअजित पवारांचे भाषण सुरू असताना  चंद्रकांत पाटील कार्यक्रमस्थळी पोहोचले. त्यावरून उपस्थितांना त्यांनी आरोग्याचे सल्ले दिले. वेळेत उठा, कार्यक्रमाला वेळेत जायला शिका, असे ते यावेळी म्हणाले.

Marathi News
[pj-news-ticker]
Browse by category:

Kolhapur

Maharashtra

National

International

Entertainment

Sports

Health

Lifestyle

Browse by brands: