Source: Sakal Kolhapur
99386तळसंदे : येथील रावसाहेब मोहिते यांच्या विहिरीत पडलेल्या कोल्ह्यास जीवदान दिले.—विहीरीत पडलेल्या कोल्ह्यास जीवदानसंजय पाटील ः सकाळ वृत्तसेवाघुणकी, ता. २: तळसंदे येथील विहीरीत पडलेल्या कोल्ह्यास कृषी विज्ञान केंद्र व डॉ. डी. वाय. पाटील कृषी व तंत्र शिक्षण समूहाच्या कर्मचाऱ्यांनी वनविभागाच्या मार्गदर्शनाखाली अथक परिश्रमातून जीवदान दिले. यामुळे या परीसरात समाधान व्यक्त झाले.तळसंदे येथील तळी नावाने ओळखल्या जाणाऱ्या शेतामध्ये रावसाहेब पांडुरंग मोहिते यांची विहीर आहे. पाण्याच्या शोधात असताना कोल्हा विहिरीमध्ये पडला. शेतातील पिकाला पाणी देण्यासाठी विद्युत पंप सुरू करण्यासाठी श्री. मोहिते गेले असता कोल्हा विहिरीत पडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी ही माहिती कोडोली पोलिस ठाण्याचे कर्मचारी अजिंक्य जाधव (तळसंदे) यांना दिली. श्री. जाधव यांनी याबाबत वनविभागाला कळवले. वनक्षेत्रपाल रमेश कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल साताप्पा जाधव यांनी घटनास्थळी भेट देऊन रेस्क्यू टीममधील वन्यजीव अभ्यासक देवेंद्र भोसले, नितीन कुंभार ,राजवर्धन पाटील, अवधूत सावंत, सुदेश खिदुगडे यांना मार्गदर्शन केले. लाकडी शिडीद्वारे त्यास बाहेर काढले. डीवायपीच्या कर्मचाऱ्यांनी तत्परता दाखवल्याने कोल्ह्यास जीवदान मिळाले.