Source: Sakal Kolhapur
99487गगनबावडा : शाळेला लेझीम भेट देताना गटविकास अधिकारी माधुरी परीट, प्राचार्य रंगराव गोसावी, प्रा. कुंडलिक जाधव, दिगंबर बुवा, निरंजन सांगवडेकर, आनंदनाथ सांगवडेकर आदी.
‘विश्वपंढरी’ संस्थेतर्फे लेझीम भेटगगनबावडा : येथील परशुराम विद्यालय व कस्तुरबा गांधी निवासी शाळेच्या मुलींना विश्वपंढरी संस्था, कोल्हापूरतर्फे पन्नास लेझीम भेट देण्यात आले. गगनबावडा पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी माधुरी परीट यांच्या हस्ते लेझीम भेट देण्यात आले. या वेळी विश्वपंढरी संस्थेचे अध्यक्ष निरंजन सांगवडेकर, आनंदनाथ सांगवडेकर उपस्थित होते. या वेळी गटविकास अधिकारी परीट यांनी जिल्ह्यामध्ये एक उत्कृष्ठ लेझीम पथक परशुराम विद्यालयाच्या मुली तयार करतील, असा विश्वास व्यक्त केला. या वेळी प्राचार्य रंगराव गोसावी, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते. दिगंबर बुवा यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. कुंडलिक जाधव यांनी आभार मानले.