कोल्हापूर : जिल्ह्यातील यंत्रणांनी जिल्हा वार्षिक योजना आणि अनुसूचित जाती उपाययोजनांमधील मंजूर सर्व निधी खर्च होईल याची दक्षता घ्या. प्रशासकीय मान्यतेसाठी २० तारखेपर्यंत प्रस्ताव दाखल करावेत, अशी सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी बुधवारी केली.
जिल्हाधिकारी कार्यालयातील राजर्षी छत्रपती शाहू सभागृहात आयोजित सर्व विभाग प्रमुखांच्या जिल्हा वार्षिक योजना आणि अनुसूचित जाती उपयोजनांबाबतच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी विजय पवार आणि सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी विभागवार मंजूर नियतव्यय, समर्पित निधी याबाबत सादरीकरण केले.
जिल्हाधिकारी देसाई म्हणाले, आयपास प्रणालीद्वारे २० जानेवारीपर्यंत प्रशासकीय मान्यतेसाठी प्रस्ताव दाखल करावेत. सर्व विभाग प्रमुखांनी त्यांना मंजूर झालेला नियतव्यय वेळेत खर्च करावा. शक्यतो निधी समर्पित होणार नाही याची दक्षता घ्यावी. याव्यतिरिक्त मोठ्या योजनेसाठी राज्य शासनाकडे काही निधी मागायचा असेल तर त्याचे सविस्तर प्रस्तावही २३ तारखेपर्यंत द्यावेत.
बैठकीला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने, डीआरडीएचे प्रकल्प संचालक रवी शिवदास, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. वाय. ए. पठाण, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय सोनवणे, जिल्हा समाजकल्याण अधिकारी दीपक घाटे, महिला व बाल विकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सोमनाथ रसाळ यांच्यासह सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.
—
फोटो नं १३०१२०२१-कोल-जिल्हा नियोजन बैठक
ओळ :
जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी जिल्हा वार्षिक योजना आणि अनुसूचित जाती उपयोजनांबाबतची आढावा बैठक झाली.
—
.sponsored-poll{clear:both; margin-bottom: 20px; background:#f2f2f2; padding-bottom: 1px;} .sp-poll-head{background:#538ed5; color: #fff; padding:10px 20px; font-size: 20px; line-height: 25px; margin-bottom: 20px;} .sp-poll-widget{padding: 10px; margin: 0px 5px 5px; background:#e6e6e6; position: relative;} .sponsored-poll:after, .sp-poll-widget:after{content:”; display: block; clear: both;} .sp-poll-question{font-weight: 500;} .article-page .article-body p.sp-options{width: 100%; text-align: center; margin-bottom: 0px;} .sp-options span{display: inline-block; vertical-align: middle; margin: 0 10px;} .sp-options span input,.sp-options span label{display: inline-block; vertical-align: middle; margin: 0px; } .sp-options span input{margin-right: 5px;} .sp-options span.values{font-weight: bold;} .sp-poll-widget.poll-submitted:before{content: ”; display: block; position: absolute; left: 0; top: 0; right: 0; bottom: 0; z-index: 1; background:rgba(255,255,255,0.8);} .sp-options-mobile{display: none;} @media all and (max-width:767px){ .sp-poll-head{margin-bottom: 10px; padding: 5px 10px; font-size: 18px; line-height: 23px;} .article-content .article-contentText p.sp-options{width: 100%; display: table; margin-bottom: 5px;} .sp-options span input{margin-right: 2px;} .sp-options span{padding: 0px; margin:0px 5px; text-align: center; display: table-cell;} .sp-options span:first-of-type{margin-left: 0px; padding-left: 0px;} .sp-options span:last-of-type{margin-right: 0px;} .sp-options span.values{display: none;} .article-content .article-contentText p.sp-options-mobile{display: block; margin-bottom: 5px; padding: 0px 10px;} .sp-options-mobile .values{float:left; font-weight: bold; display: block; line-height: 20px;} .sp-options-mobile .values:nth-of-type(2){float:right;} .sp-options-mobile:after{display: block; content:”; clear: both;} } @media all and (max-width:320px){ .article-content .article-contentText p.sp-options-mobile{padding: 0px 5px;} } $(document).ready(function(){function a(a){var o=document.cookie.match(“(^|;) ?”+a+”=([^;]*)(;|$)”);return o?o[2]:null}function o(a,o){var t=new Date;t.setTime(t.getTime()+31536e6),document.cookie=a+”=”+o+”;expires=”+t.toUTCString()+”;path=/;domain=lokmat.com”}if(null==a(“survey2_status”)||null==a(“survey2_status”)){$(“.article-content p:last”).after(“