Source: Sakal Kolhapur
लोकअदालतीत कागलला४७ प्रकरणांची तडजोड ३० लाखाहून अधिक रक्कम वसूल कागल, ता. ३० : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांचे निर्देशानुसार कागल येथील दिवाणी न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीची आयोजन करण्यात आले होते. या लोक अदालतीला प्रतिसाद मिळाला. लोकअदालतमध्ये बँक, ग्रामपंचायतीची प्रि–लिटीगेशनची तसेच दिवाणी व फौजदारी अशी एकूण ४७ तडजोडीने निकाली करण्यात आली. सदर प्रकरणात एकूण ३० लाख ३२ हजार ३१७ रुपये इतक्या रकमेची वसूली करणेत आली.सदर लोकअदालतमध्ये प्रि–लिटीगेशनची बँक ११३३ पैकी सात प्रकरणे तडजोडीने निकाली करण्यात आली. सदर प्रकरणात १७ लाख ४० हजार ४९३ रुपये इतक्या रकमेची वसूली करणेत आली. प्रि-लिटीगेशनची ग्रामपंचायत ३१३ प्रकरणांपैकी २४ प्रकरणे तडजोडीने निकाली करणेत आली. सदर प्रकरणांत ७४ हजार ७८७ रुपये रकमेची वसूली करणेत आली. तसेच प्रलंबित दिवाणी प्रकरणापैकी चार व फौजदारी १२ प्रकरणांमध्ये तडजोड होऊन सदर प्रकरणे निकाली करण्यात आली, तर तडजोड झालेल्या प्रकरणात १२ लाख १७ हजार ३७ रुपये इतक्या रकमेची वसूली झाली. अशी एकूण ३० लाख ३२ हजार ३१७ रुपयांची वसूली झाली. यावेळी दिवाणी न्यायाधीश ए. बी. जवळे यांनी पॅनेल प्रमुख म्हणून काम पाहिले. तसेच ॲड. बी. ए. मसवेकर यांनी पॅनेल सदस्य म्हणून काम पाहिले. दिवाणी न्यायाधीश बी. डी. गोरे यांच्यासह वकील, सर्व न्यायालयीन कर्मचारी व पक्षकार उपस्थित होते.