Source: Sakal Kolhapur
लोकशाही दिनात ६ अर्ज दाखलकोल्हापूर ः महापालिकेत मंगळवारी झालेल्या लोकशाही दिनामध्ये ६ अर्ज दाखल झाले. त्यापैकी नगररचना विभागाशी संबंधित चार, आरोग्य व पवडी विभागाशी संबंधित प्रत्येकी एक अर्ज आहे. लोकशाही दिनामध्ये दाखल झालेल्या तक्रारींचे तातडीने निराकरण करण्यात यावे अशा सूचना प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.