Source: Sakal Kolhapur
लायन्स क्लब रॉयलचे पुरस्कार जाहीरगडहिंग्लज, ता. ५ : येथील लायन्स क्लब ऑफ रॉयलमार्फत गडहिंग्लज, आजरा, चंदगड, कागल, भुदरगड, कुडाळ व सावंतवाडीतील शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर केले आहेत. शिक्षक दिनाचे औचित्य साधत या पुरस्कारांसाठी निवड केल्याचे अध्यक्ष डॉ. पी. पी. पाटील यांनी सांगितले. विभागनिहाय पुरस्कार विजेते शिक्षक असे- गडहिंग्लज- अर्जुन हराडे, रमन लोहार, अमित चव्हाण, संपत सावंत, रमेश चौगुले, सचिन रेडेकर. आजरा- प्रशांत गुरव, पुंडलिक केसरकर. चंदगड-विश्वनाथ गावडे, सुरेश तुर्केवाडीकर, आप्पाराव पाटील, बाबुराव वर्पे, संजय साबळे. भुदरगड- मधुरा चव्हाण, सचिन परिट. कागल- मुकुंद हावळ, निसारीअहमद मुल्ला, रविंद्र जालीमसर, हिंदुराव मातळे. सावंतवाडी- संदीप साळसकर, योगेश सामंत, विकास राठोड, संजय सावंत, एस. ए. कांबळे, राजाराम फर्जंद, नंदकुमार नाईक.