लम्पी फॉलोअप

Share on facebook
Facebook
Share on linkedin
LinkedIn
Share on whatsapp
WhatsApp

Source: Sakal Kolhapur

जिल्ह्यात लम्पीमुळे चार जनावरे दगावली तीव्रता कायम; लसीकरण मोहीम गतीनेसकाळ वृत्तसेवा कोल्हापूर, ता. २२ ः लम्पी त्वचा विकाराची तीव्रता कायम असून जिल्ह्यात आज दिवसभरात ३१ जनावरांना बाधा झाली. तर ४ जनावरांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात लम्पीमुळे मृत्यू झालेल्या जनावरांची संख्या ३३ वर पोहचली आहे. आजवर एकूण ७१२ जनावरांना लागण झाली आहे. यातील २२० जनावरे रोगमुक्त झाल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाने दिली.जिल्ह्यातील गायवर्गीय जनावरांना लम्पीची लक्षणे दिसत आहेत. आज मृत्यू झालेल्या जनावरांत अब्दुललाट येथील दोन, तर कोडोलीतील दोन जनावरांचा समावेश आहे. लम्पी नियंत्रणात आणण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने दोन लाख २१ हजार जनावरांना लसीकरण केले. यातून रोग लागण होण्याचे प्रमाण ०.२५ टक्के आहे. रोग बरा होण्याचे प्रमाण ३२ टक्के आहे. मृत्यूचे प्रमाण ४.६६ टक्के आहे. त्यामुळे जेथील जनावरांना लम्पीची लक्षणे दिसतात, अशा जनावर मालकांनी लम्पीच्या जनावरांना सोडून न देता उपचार घ्यावेत, असे आवाहन शासकीय पशुवैद्यक करीत आहेत.हातकणगंले, पन्हाळा, शिरोळ तालुक्यातील सात गावांत जनावरांना लम्पीची लागण ठळक दिसत आहे. लसीकरण, निदान व उपचारसेवा प्रभावी सुरू आहे. शासनाने दिलेल्या लस व औषधांचा वापर सुरू आहे. त्यामुळे जिथे लम्पीची लक्षणे दिसताच अशा जनावरांना अन्य जनावरांपासून दूर बांधावे, तसेच तातडीने शासकीय पशू वैद्याकडून बाधित जनावरांना उपचार करून घ्यावेत.

.

eZy News
LATEST
>>गुंडाचा डोक्यात दगड घालून खून>>आजरा येथे जुगार आड्यावर छापा.>>झुलन गोस्वामीची अखेरची लढत>>Lumpy skin disease : लम्पी स्कीनप्रकरणी उच्च न्यायालयात जनहित याचिका>>कागल : राष्ट्रवादी पक्षाची विजयाची नांदी – आमदार हसन मुश्रीफ>>चंदगडी हिसका दाखवू>>शिराळा : विश्वास कारखाना वार्षिक सभा>>राक्षीतील घरफोड्याला अटक; वाघबीळ घाटात कारवाई, घरफोडीतील सोन्या-चांंदीचे दागिने जप्त>>शिक्षणाचा खेळखंडोबा होऊ देणार नाही – मंत्री केसरकर>>गांधी समजून घेताना>>कोल्हापूरला जयपूर करू -नुतन पालकमंत्री दीपक केसरकर>>म.ह. शिंदे महाविद्यालय>>जातिविहीन व्हा, उच्चनिचतेच्या भिंती जमीनदोस्त करा”>>अन्नपुर्णा’ शुगरचा सोमवारी द्वितीय गळीत हंगाम शुभारंभ>>‘सीबीआय’ कडून कागलमधील तरुणाची चौकशी>>लम्पी>>लव्हटे परिसंवाद>>कोजिमाशिची आज वार्षिक सभा>>नवरात्रोत्सव>>६५ हजारांचे दागिने जप्त
Browse by category:

Kolhapur

Maharashtra

National

International

Entertainment

Sports

Health

Lifestyle

Browse by brands: