Source: Sakal Kolhapur
00992रोहित मडावी ‘उत्कृष्ट तारमार्ग कर्मचारी’
असळज ः महावितरण ग्रामीण विभाग १ कोल्हापूरचे तंत्रज्ञ रोहित मिलन मडावी यांना महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीकडून २०२२-२३ करिता ‘उत्कृष्ट तारमार्ग कर्मचारी’ म्हणून गौरविले. १ मे कामगारदिनी कोल्हापूर परिमंडळात ऊर्जावन भरारी गुणवंत कामगार सत्कार समारंभप्रसंगी हा गौरव पुरस्कार प्रदान केला. रोहित मडावी यांनी गगनबावडा तालुक्यातील शेणवडे फिडरवर मांडुकली, अणदूर व शेणवडे कार्यक्षेत्रात विद्युत वाहिन्यांची देखभाल, तांत्रिक समस्यांचे निराकरण, ग्राहकांना उत्कृष्ट सेवा देणे ही कर्तव्ये बजावली. त्यांच्या समर्पित सेवेची दखल घेत उत्कृष्ट तारमार्ग कर्मचारी म्हणून त्यांना गौरविले. कार्यक्रमास प्रकल्प तथा मानव संसाधन संचालक प्रसाद रेशमे, मुख्य अभियंता परेश भागवत, अधीक्षक अभियंता धर्मराज पेठकर, अंकुर कावळे, सहा. महाव्यवस्थापक शशिकांत पाटील, भूपेंद्र वाघमारे यांची उपस्थिती होती.