Source: Lokmat Health
भारतातील बहुतांश घरांमध्ये गव्हाच्या पिठाची चपाती केली जाते. रोजच्या आहारात चपातीचा समावेश असतो. गव्हाच्या पिठाची पोळी खाण्याचे अनेक फायदे आहेत. पण आपण त्यात बेसनाचे पीठ मिसळून चपातीला आणखी पौष्टीक करू शकता. गव्हात बेसन घातल्याने चपात्या आणखी पौष्टीक होतात.
बेसनामध्ये प्रोटीन, फायबर तसेच अँटिऑक्सिडंट्स, लोह आणि जीवनसत्त्वे असतात. पौष्टीक चपाती करण्यासाठी समप्रमाणात गव्हाचं पीठ आणि बेसनाचं पीठ घ्या. जेणेकरून दोन्ही धान्यांचे फायदे आपल्या शरीराला मिळतील. गहू आणि बेसनाची पोळी खाल्ल्याने शरीराला कोणते फायदे मिळतात. पाहूयात(Is it a good idea to add besan to your chapatis for health benefits?).
डायबिटिजग्रस्त रुग्णांसाठी फायदेशीर
ऑन्ली माय हेल्थ या वेबसाईटनुसार, बेसन मधुमेहग्रस्त रुग्णांसाठी फायदेशीर ठरते. मधुमेहग्रस्त रुग्णांनी गव्हाच्या पिठात बेसन नक्कीच मिक्स करून खावे. बेसनाचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो, त्यामुळे मधुमेहग्रस्त रुग्णांसाठी ते चांगले मानले जाते. नियमित गव्हाच्या पिठात बेसन मिक्स करून खाल्ल्याने साखरेची पातळी नियंत्रणात राहते.
रात्री झोपण्यापूर्वी जिऱ्याचे पाणी पिण्याचे ६ आरोग्यदायी फायदे, वजन होईल कमी- सुधारेल पचन झटपट
वजन कमी करण्यासाठी फायदेशीर
गहू आणि बेसानाची चपाती खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते. बेसनामध्ये कॅलरीज कमी असतात. ज्यामुळे अतिरिक्त चरबी कमी होते. यासह पोट दीर्घकाळ भरलेले राहते. ज्यामुळे आपण उलट – सुलट खाणे टाळतो.
प्रोटीनचे उत्तम स्त्रोत
बेसनाला प्रोटीन्सचा उत्तम स्त्रोत मानले जाते. बेसनामध्ये २० ग्रॅम प्रथिने आढळतात. जेव्हा आपण त्यात समप्रमाणात गव्हाचं पीठ मिसळतो, तेव्हा प्रोटीनचे प्रमाण वाढते. जे स्नायू तयार करण्यात व रोगांशी लढण्यासाठी मदत करतात.
रात्री जेवणानंतर वेलची खाण्याचे ४ भन्नाट फायदे, पचन सुधारेल, तोंडाची दुर्गंधीही दूर होईल
मूड चांगला होतो
बेसनामध्ये लोह मुबलक प्रमाणात आढळते. शरीरात लोह आणि कॅल्शियमचे प्रमाण योग्य प्रमाणात असेल तर, मानसिक आरोग्य सुधारते. यामुळे आपले मूड स्विंग्स होत नाही. गव्हाच्या पिठात फायबरचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे पचनक्रिया उत्तम राहते. यासह बद्धकोष्ठतेचा त्रासही होत नाही.
बॅड कोलेस्टेरॉल वाढत नाही
जर आपली कोलेस्ट्रॉलची पातळी जास्त असेल तर, गहू आणि बेसनाची पोळी करून खा. यामुळे खराब कोलेस्टेरॉलची पातळी कमी होते. ज्यामुळे हृदयाच्या निगडीत असणाऱ्या समस्यांपासून आराम मिळते.