Source: Sakal Kolhapur
हालोंडी येथे मंडप कोसळून नुकसाननागाव : लग्नाच्या रिसेप्शनसाठी उभारण्यात आलेला मंडप वादळी वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसाने कोसळला. यामध्ये रिसेप्शनसाठी उपस्थित महिलांसह अनेकजण किरकोळ जखमी झाले. अनेकांच्या मोटारी व मोपेड मंडपाखाली अडकल्याने मोठे नुकसान झाले. सोमवारी ( ता. २२ ) रात्री अकराच्या सुमारास कोल्हापूर – सांगली महामार्गावरील हालोंडी येथे असणाऱ्या लॉनमध्ये ही दुर्घटना घडली. आयोजक आणि संयोजक दोघांनीही या दुर्घटनेबाबत मौन पाळले. त्यामुळे शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल झाली नाही.