Source: Sakal Kolhapur
नवनिर्मितीच्या युगात चारित्र्य घडवणे आवश्यक : शिरोळकरकोल्हापूर, ता. २४ ः नवनिर्मितीच्या या युगात चारित्र्य घडवण्यावर लक्ष देणे गरजेचे आहे. रामायणातील व्यक्तिमत्त्वे जगभरात दिशादर्शक आहेत. राष्ट्र उभारणीच्या कार्यात आपले सर्वस्व अर्पण केले अशी राजमाता जिजाऊ, राणी लक्ष्मीबाई, राजयोगिनी अहिल्याबाई होळकर, भगिनी निवेदिता, समितीच्या संस्थापिका लक्ष्मीबाई केळकर, ताई आपटे अशी कित्येक व्यक्तिमत्त्वे आदर्शवत आहेत, असे राष्ट्र सेविका समितीच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांत सहबौद्धिक प्रमुख मैत्रेयी शिरोळकर यांनी सांगितले. समितीचा प्रशिक्षण वर्गाच्या समारोपप्रंसंगी त्या बोलत होत्या. राष्ट्र सेविका समितीचा प्रशिक्षण वर्ग ५ ते २० मे या कालावधीत पद्माराजे गर्ल्स हायस्कूल येथे झाला. शिवाजी विद्यापीठाच्या लोकविकास केंद्र संचालक डॉ. मंजूषा देशपांडे या प्रमुख पाहुण्या होत्या. वर्ग कालावधीमध्ये समितीच्या अखिल भारतीय संपर्कप्रमुख पुनम शर्मा, सहसंपर्क प्रमुख नीतादेवी भंडारी, क्षेत्र कार्यवाह सुनंदा जोशी यांनी भेट दिली. विभाग कार्यवाह मुग्धा वैद्य यांनी प्रास्ताविक केले. जिल्हा कार्यवाह मेघा कुलकर्णी यांनी आभार मानले.