Source: Sakal Kolhapur
राशिवडे मंडळ विभागात आज महाराजस्व अभियानराशिवडे बुद्रु, ता. २ : राशिवडे मंडळ महसूल विभागातील सर्व गावांसाठी उद्या (ता. ३) येथे महाराजस्व अभियान आयोजित केले आहे. येथील नागेश्वर हायस्कूलच्या परिसरात हे अभियान होणार असून या मंडळ कार्यालयातील सर्व गावांमध्ये समाविष्ट असलेल्या नागरिकांसाठी शासनाच्या सर्व खात्यातील अडीअडचणी सोडविण्यात येतील. शिवाय विविध प्रकारचे दाखले प्रलंबित कामे यांचा निपटारा ही केला जाणार आहे. यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन तहसीलदार मीना निंबाळकर यांनी केले आहे.