Source: Sakal Kolhapur
राशिवडे बुद्रुक येथे उत्स्फूर्तपणे बंदराशिवडे बुद्रुक : हेर्लेत (ता. हातकणंगले) महापुरुषांच्या फलकाची विटंबना केल्याचा निषेध म्हणून आज येथे उत्स्फूर्त बंद पाळण्यात आला. संपुर्ण गाव दिवसभर बंद राहिले. व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवुन निषेध व्यक्त केला. दिवसभर व्यवहार बंद ठेवून ठेवण्यात आले. या वेळी राशिवडे व्यापारी असोशिएशनचे अध्यक्ष सागर धुंदरे, सरपंच संजीवनी अशोक पाटील, उपसरपंच अजिंक्य गोनुगडे, सदस्य सर्जेराव गोंगाणे, प्रकाश पोवार, मानसी शिंदे यांनी शांततेची आवाहन केले. राधानगरीच्या पोलिस निरिक्षक स्वाती गायकवाड यांनी बंदोबस्त ठेवला होता.————बांबवडे बाजारपेठ बंदबांबवडे ः येथील बाजारपेठ आज पूर्णपणे बंद ठेवून हेरलेतील महापुरूषांच्या फलकाच्या विटंबनेचा निषेध व्यक्त केला. व्यापारी व व्यवसायिकांनी आपले व्यवहार पूर्ण बंद ठेवले होते. बांबवडे येथून निषेध पदयात्रा काढली गेली. विजय गिताने सांगता झाली. या वेळी व्यापारी, ग्रामस्थ उपस्थित होते.——————–शाहूवाडी, मलकापूर येथे कडकडीत बंदमलकापूर ः हेरले येथील महापुरूषांच्या फलक विटंबनेच्या निषेधार्थ आज शाहूवाडी, मलकापूर येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. येथील मुख्य बाजारपेठ रस्त्यावरून फेरी काढत बंदमध्ये सहभागी होण्यासाठी नागरिकांना आवाहन केले होते. त्यास नागरिक व व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यामूळे आज येथील व शाहूवाडीतील बाजार पेठेत पूर्णतः शुकशुकाट होता. फेरीनंतर येथील सुभाष चौकात निषेध व्यक्त करणेत आला. या वेळी भाजपचे प्रविण प्रभावळकर, शिवसेनेचे विजय देसाई, राष्ट्रवादीचे प्रकाश पाटील, भारत गांधी, संजय भोपळे, मनसेचे तांदळे यांचेसह नागरिक उपस्थित होते.