Source: Sakal Kolhapur
01542रायफल शुटींगमध्येवेदांत पाटील प्रथमइचलकरंजी : राज्यस्तरीय रायफल शुटींग क्रीडा स्पर्धेमध्ये १० मीटर पीप साईट रायफल शूटिंग स्पर्धेत १७ वर्षाखालील गटात मुलांमध्ये वेदांत किरण पाटील याने ४०० पैकी ३९७ गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला. क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे स्पर्धा झाल्या. वेदांत मूळचा रुकडी (ता. हातकणंगले) येथील असून तो सध्या लक्ष्य शूटिंग अकॅडमी पनवेल, नवी मुंबई येथे सराव करीत आहे.