राधानगरी, दाजीपूर आराखड्याचे सादरीकरण

Share on facebook
Facebook
Share on linkedin
LinkedIn
Share on whatsapp
WhatsApp

Source: Sakal Kolhapur

राधानगरी, दाजीपूर आराखड्याचे सादरीकरणइको टुरिझमला प्राधान्य; झुलता पूल, उद्यानासह म्युझिक शोचा समावेशसकाळ वृत्तसेवाकोल्‍हापूर, ता. २२ : राधानगरी धरण परिसरासह दाजीपूर अभयारण्य परिसरात इको टुरिझम विकसित करण्याचे नियोजनबद्ध प्रयत्‍न सुरू आहेत. यामध्ये निसर्गाशी अनुरुप पर्यटन विकासासाठी मागील दहा, पंधरा वर्षांत प्रयत्‍न सुरू आहेत. राधानगरी धरणस्‍थळाचा विकास करण्यासाठीही २७ कोटींच्या आराखड्याचे नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सादरीकरण केले. यामध्ये धरणस्‍थळ परिसरात झुलता पूल, धरणाची प्रतिकृती यांसह अनेक बाबींचा समावेश आहे. पर्यटनातून स्थानिकांना रोजगाराच्या संधी देत असतानाच शहरातील लोकांना पर्यावरण संतुलित पर्यटन करण्याची उपलब्‍धी निर्माण होणार आहे.राधानगरी, दाजीपूर अभयारण्य परिसरात विकास प्रकल्‍पांवर अनेक निर्बंध आले आहेत. याचा परिणाम येथील रोजगारावर झाला आहे. शेतीसह इतर उद्योग करण्यावरही मर्यादा आहेत. त्यामुळे या निर्बंधांचा विचार करून, पर्यावरणाला धोका होणार नाही, या पद्धतीने दाजीपूर व राधानगरी धरण परिसराचा विकास करण्याचे नियोजन करण्याच्या उद्देशाने पर्यटन विकास आराखडा सादर केला आहे. यामध्ये पर्यावरणपूरक व पर्यटकांसाठी उपयुक्‍त प्रकल्‍प घेण्यात येत आहे. राधानगरी हा पर्यटन तालुका असल्याने त्याअनुषंगाने सोयीसुविधा निर्माण करण्याच्या उद्देशाने पर्यटन विभागाला २७ कोटींचा प्रस्‍ताव सादर केला आहे. यामध्ये माहिती केंद्रापासून ते झुलत्या पुलापर्यंत आणि उद्यांनापासून ते कारंज्या आणि लाईट, म्युझिक शो पर्यंत अनेक घटकांचा समावेश आहे. या आराखड्याला मंजुरी मिळाल्यास धरण परिसराचे संपूर्ण चित्रच बदलल्याचे पाहायला मिळणार आहे.

कोटराधानगरी धरण राजर्षी शाहू महाराजांनी सर्वांसाठी दिलेला अमूल्य ठेवा आहे. त्यामुळेच धरण परिसरात राजर्षी शाहू महाराजांचे भव्यदिव्य व प्रेरणादायी स्‍मृति केंद्र उभारले आहे. या सर्व परिसराचा सर्वांगीण विकास आराखडा तयार केला आहे. धरण परिसरासह दाजीपूर अभयारण्यातही इको टुरिझम प्रकल्‍प राबवला जात आहे. प्रकाश आबिटकर, आमदार

राधानगरी धरण परिसराचा विकास करण्यासाठी जिल्‍हा परिषदेतून पहिल्यांदा निधी लावला. पंधरा वर्षांपासून टप्‍प्याटप्‍प्याने या परिसराचा विकास होत आहे. दरवर्षी लाखो लोक भेट देऊन शाहू महाराजांच्या कार्याची प्रेरणा घेत आहेत. महाराजांच्या कार्याची आणखी माहिती देणारे उपक्रम निर्माण केले जाणार आहेत. यासाठी पर्यटन विभागाकडे आराखडाही सादर केला आहे. लवकरच त्याला मंजुरी मिळेल.- अभिजित तायशेटे, संचालक गोकुळ

eZy News
LATEST
>>गुंडाचा डोक्यात दगड घालून खून>>आजरा येथे जुगार आड्यावर छापा.>>झुलन गोस्वामीची अखेरची लढत>>Lumpy skin disease : लम्पी स्कीनप्रकरणी उच्च न्यायालयात जनहित याचिका>>कागल : राष्ट्रवादी पक्षाची विजयाची नांदी – आमदार हसन मुश्रीफ>>चंदगडी हिसका दाखवू>>शिराळा : विश्वास कारखाना वार्षिक सभा>>राक्षीतील घरफोड्याला अटक; वाघबीळ घाटात कारवाई, घरफोडीतील सोन्या-चांंदीचे दागिने जप्त>>शिक्षणाचा खेळखंडोबा होऊ देणार नाही – मंत्री केसरकर>>गांधी समजून घेताना>>कोल्हापूरला जयपूर करू -नुतन पालकमंत्री दीपक केसरकर>>म.ह. शिंदे महाविद्यालय>>जातिविहीन व्हा, उच्चनिचतेच्या भिंती जमीनदोस्त करा”>>अन्नपुर्णा’ शुगरचा सोमवारी द्वितीय गळीत हंगाम शुभारंभ>>‘सीबीआय’ कडून कागलमधील तरुणाची चौकशी>>लम्पी>>लव्हटे परिसंवाद>>कोजिमाशिची आज वार्षिक सभा>>नवरात्रोत्सव>>६५ हजारांचे दागिने जप्त
Browse by category:

Kolhapur

Maharashtra

National

International

Entertainment

Sports

Health

Lifestyle

Browse by brands: