Source: Sakal Kolhapur
40809जालना ः येथे राजुरी स्टीलच्या विस्तारीत प्रकल्पाचे उद्घाटन स्टील मंत्रालयाच्या अतिरिक्त सचिव रूचिका चौधरी गोविल यांच्या हस्ते झाले. त्यावेळी रावसाहेब दानवे पाटील, कौस्तुभ लोया आदी.
राजुरी स्टीलच्याप्रकल्पाचे उद्घाटनपुणे, ता. ३ ः बांधकाम क्षेत्रात टीएमटी उत्पादनामध्ये अग्रगण्य असलेल्या राजुरी स्टील कंपनीने जालन्यात सुरू केलेल्या २५ एकरमधील विस्तारीत प्रकल्पाचे उदघाटन स्टील मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव रूचिका चौधरी गोविल यांच्या हस्ते आणि ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे पाटील यांच्या उपस्थितीत नुकतेच झाले. ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन राजुरी स्टीलने जालना येथे २०२० मध्ये या प्रकल्पास सुरवात केली. कोरोनामुळे पुढे सहा महिन्यांसाठी प्रकल्पाचे काम थांबवावे लागले. त्यानंतर लॉकडॉऊन दूर झाल्यावर कंपनीने नव्या दमाने प्रकल्पाला सुरवात केली आणि तो पूर्ण झाला. आंतरराष्टीय मानकाची अत्याधुनिक उपकरणे आणि यंत्र सामग्रीने सुसज्ज असा ग्रीन फिल्ड प्रकल्प बघून चौधरी- गोविल आणि दानवे, यांनी कंपनीचे तरुण संचालक कौस्तुभ लोया यांची पाठ थोपटली. तसेच या प्रसंगी खाण मंत्रालय, राज्य उद्योग मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी तसेच केंद्रीय अधिकारी आणि आयसीटी विश्व विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी भेट देऊन राजुरी स्टीलच्या प्लांटची सखोल माहिती राजुरी स्टीलचे जनरल मॅनेजर संदीप खरात यांच्या घेतली. या प्रसंगी स्टील असोसिएशनचे अध्यक्ष योगेश मानधनी, राजुरी स्टीलचे संचालक संतोष मुंदडा, शिवकुमार लोहिया , पुरुषोत्तम तोष्णीवाल , रमेश मुंदडा, आणि भास्करराव दानवे आदी उपस्थित होते.