Source: Sakal Kolhapur
01135राजश्री पचंडी —-राजश्री पचंडी यांनाआदर्श तलाठी पुरस्कारकोवाड : येथील तलाठी राजश्री पचंडी यांना यावर्षीचा कोल्हापूर जिल्हा आदर्श तलाठी पुरस्कार जाहीर झाला आहे. तेरा वर्षाच्या सेवाकाळात त्यांनी लोकाभिमूक कार्यातून छाप पाडल्याने शासनाने त्यांच्या कामाची दखल घेऊन हा पुरस्कार जाहीर केला आहे. यापूर्वी त्यांना पुणे विभागात क्षेत्रीयस्तरावर उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल विभागीय आयुक्तांच्यावतीने सन्मानचिन्ह देऊन गौरवले आहे. त्यांनी कायदा आणि नियम यांची व्यवहाराशी सांगड घालत लोकांना विश्वासात घेऊन पाणंद रस्ते खुले करण्यात मोठे योगदान दिल्याने चंदगड तालुक्यातील अनेक गावातील पाणंद रस्त्यांचा प्रश्न मार्गी लागला आहे. त्यांच्या याच कामाची दखल घेऊन हा पुरस्कार जाहीर झाला आहे. महाराष्ट्र दिनी पालकमंत्री दिपक केसरकर यांच्याहस्ते त्यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे.