Source: Sakal Kolhapur
00309…
चला, शाहूंची स्मारके जाणून घेवूया …
शाहू स्मारक भवनात प्रदर्शनाला प्रारंभ
कोल्हापूर, ता. ३ ः राजर्षी शाहू तालुका मंच आणि राजर्षी शाहू स्मृती शताब्दी समितीच्या वतीने आजपासून ‘अशी घडली शाहूंची स्मारके‘ प्रदर्शनाला प्रारंभ झाला. माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उदघाटन झाले. सहा मेपर्यंत सकाळी दहा ते रात्री आठ या वेळेत प्रदर्शन सर्वांसाठी खुले राहणार आहे. राजर्षी शाहू छत्रपती महाराजांचे मोठे उपकार आपल्यावर असून त्यातून उतराई कदापी शक्य नाही. महाराजांच्या निधनानंतर त्यांचे विचार व कार्याची ज्योत तेवत रहावी, यासाठी पुतळे, पुस्तके, स्मारके यांची निर्मिती झाली. त्याची माहिती या प्रदर्शनातून मिळणार असल्याचे समितीचे अध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी सांगितले. यावेळी इंद्रजीत सावंत, बबनराव रानगे, दिलीप पोवार, डी. जी.भास्कर, कादर मलबारी, सी. एम. गायकवाड, संभाजीराव जगदाळे, शशिकांत पाटील, महेश मछले, इंद्रजीत माने, उदय देसाई, शुभम शिरहट्टी, शाहिर दिलीप सावंत, शैलजा भोसले आदी उपस्थित होते.