येणेचवंडी शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप

Facebook
LinkedIn
WhatsApp

Source: Sakal Kolhapur

gad23.JPG99886येणेचवंडी : प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना प्राची शेठ-खेताणी परिवारातर्फे स्कूल बॅग्जसह शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.

———————–येणेचवंडी शाळेत शैक्षणिक साहित्य वाटपगडहिंग्लज, ता. 2 : येणेचवंडी (ता. गडहिंग्लज) येथील प्राथमिक शाळेत स्कूल बॅग्जसह शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. प्राची शेठ-खेताणी परिवारातर्फे हे साहित्य देण्यात आले. पहिली ते सातवीच्या सर्व 98 विद्यार्थ्यांना दि कॉन्झर्वेशन फौंडेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष आशिष घेवडे, रोहन राशिंगकर, अमृता राशिंगकर, बीआरसीचे विषय तज्ज्ञ दयानंद कोरवी यांच्या हस्ते साहित्य वितरत करण्यात आले. गरजू विद्यार्थ्यांना केलेल्या मदतीतून समाधान मिळत असल्याचे श्री. घेवडे यांनी सांगितले. सरपंच दिपाली कांबळे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रशांत भोसले, तानाजी कुराडे, प्रकाश इंगळे, मुख्याध्यापक काशिनाथ साखरे, भिमराव तराळ, अनिल गोणी, विनायक पोवार आदी उपस्थित होते. मारुती कोलूनकर यांनी सूत्रसंचालन केले. संजय बिरंजे यांनी आभार मानले. दरम्यान, गावातील पाच निराधार महिलांना प्राची शेठ यांच्यातर्फे महिनाभर पुरेल इतक्या जीवनावश्यक वस्तूंचे वाटप झाले. ———————गडकरीच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावागडहिंग्लज : येथील ई. बी. गडकरी होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा झाला. रिलायन्स इन्शुरन्सचे उपव्यवस्थापक डॉ. सचिन पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. प्राचार्य डॉ. आर. पी. डिसोझा अध्यक्षस्थानी होते. विद्यार्थ्यांसाठी एकदिवसीय चर्चासत्र झाले. डॉ. सतीश मडके (पेठवडगाव), डॉ. संजय मुरुकटे (चंदगड), डॉ. रणजित फुले यांनी विविध विषयावर मार्गदर्शन केले. विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष डॉ. संजय वालेकर, सचिव डॉ. सचिन इगतपुरे, डॉ. रतन नाईक, डॉ. के. के. संकेश्वरी, डॉ. अपर्णा इगतपुरे, डॉ. दादासाहेब काळे, डॉ. चंद्रकांत शिंदे, डॉ. दयानंद पाटील, डॉ. जे. एम. पाटील, डॉ. संजय तळगुळकर आदी उपस्थित होते. प्रतिक्षा माने व संयुजा तिबिले यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. ए. एस. देसाई यांनी आभार मानले.—————————शुक्रवारपासून वडरगे प्रीमियम लीगगडहिंग्लज : वडरगे (ता. गडहिंग्लज) येथे क्रिकेटप्रेमी व वडरगे ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने वडरगे प्रिमियम लीग क्रिकेट स्पर्धा होणार आहेत. शुक्रवारपासून (ता. ५) तीन दिवस ही स्पर्धा चालेल. एकूण ५५ हजार रुपये बक्षीस रकमेच्या या स्पर्धेत १२ संघांचा सहभाग आहे. छत्रपती शिवाजीराजे मैदानावर साखळी पद्धतीने ही स्पर्धा खेळविली जाणार आहे. विजेत्यांना अनुक्रमे १०१०१, ७७०१, ५५०१, ३३०१ रुपयांची रोख बक्षिसे आहेत. याशिवाय आदर्श संघ, मॅन ऑफ दी मॅच, मॅन ऑफ दी सिरीज, उत्कृष्ट खेळाडू, सर्वाधिक चौकार, सर्वाधिक षटकार, सलग चार चौकार, सलग तीन षटकार, सलग तीन विकेट, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज यासाठी विविध बक्षिसे आहेत. वडरगे प्रीमियम लीगचे हे दुसरे वर्ष आहे. क्रिकेट शौकिनांसाठी यूट्यूबवर थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. स्पर्धेच्या अनुषंगाने तयारी चालू आहे. स्पर्धा पाहण्यासाठी व खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी क्रिकेटप्रेमींनी उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.————————————–gad22.jpg : 99885श्रुती माळगीश्रुती माळगीची निवडगडहिंग्लज : येथील श्रुती माळगी हिची राष्ट्रीय योगासन स्पर्धेसाठी निवड झाली आहे. सातारा येथे नुकतीच राज्यस्तरीय योगासन स्पर्धा झाली. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातून सर्व गटातू सुमारे ४०० स्पर्धक सहभागी झाले होते. विविध वयोगटांमध्ये या स्पर्धा झाल्या. १५ ते २२ वयोगटातील मुलींच्या विभागात श्रुतीने सहावा क्रमांक मिळविला. ती सुपर सिक्समध्ये आल्याने तिची कोलकत्ता येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. योग विद्या धामचे प्रा. गुरुलिंग खंदारे यांचे तिला मार्गदर्शन मिळाले.

Marathi News
LATEST
>>कोल्हापूर : वेतवडे येथे धामणी नदीत बुडून १३ वर्षीय मुलाचा मृत्यू>>कांदा झाला स्वस्त>>पेठवडगाव: अपघात जोड>>पोलीस कोठडी>>पिवळे सोने झाले मातीमोल>>युथ समिट ऑफ समर अधिवेशन>>सीपीआर रक्षकावर हल्ला गुन्हा दाखल>>Kolhapur : हत्तीवरून मिरवणुकीने कन्याजन्माचे स्वागत; पाटील कुटुंबीयांचा आदर्श उपक्रम>>लॉरी ऑपरेटर्स हेल्मेट>>नेते, संचालक भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या पाठीशी>>मुश्रीफ कार्यक्रम>>नागोजीराव पाटणकर हायस्कूल बातमी>>ओबीसी आरक्षण वाढवण्याचा निर्णय चुकीचा ः ॲड.इंदुलकर>>‘आरसीसी-एसईटी’साठी रविवारी स्कॉलरशिप परीक्षा>>भाजप कार्यालय प्रवेश>>जंगम समाज संस्कार शिबीर>>मराठा महासंघ मेळावा>>झूम प्रकल्प पाहणी>>सौंदाळेच्या तरुणाचा दुचाकी अपघातात मृत्यू>>प्रकाशन
Browse by category:

Kolhapur

Maharashtra

National

International

Entertainment

Sports

Health

Lifestyle

Browse by brands: