fbpx
Site logo

मोदकांमुळे गणपतीत नेहमीपेक्षा जास्तच जेवलात? पोटाला त्रास होऊ नये म्हणून करा ४ गोष्टी…

Facebook
LinkedIn
WhatsApp
Had heavy lunch on Ganesh Chaturthi then follow 4 tips for better health : जास्तीच्या खाण्याने पोटाला त्रास होऊ नये आणि पचनक्रिया सुरळीत राहावी यासाठी..

Source: Lokmat Health

गणपती बाप्पाची आपण वर्षभर आतुरतेने वाट पाहत असतो. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच बाप्पाच्या आगमनाची आस लागलेली असते. हा बाप्पा येणार म्हणून डेकोरेशन, नवीन कपडे, वेगळे बजेट, मोदकांच्या वेगवेगळ्या रेसिपी, प्रसाद या सगळ्याची रेलचेल असते. बाप्पा आले की त्यांच्यासोबत घरी भरपूर पाहुणेही येतात. मग उकडीचे, तळणीचे, खव्याचे असे वेगवेगळ्या प्रकारचे मोदक आणि मिष्टान्न केले जाते. पाहुण्यांसोबत गोडाधोडाचे जेवताना नेहमीपेक्षा ४ घास जास्तच खाल्ले जातात. पावसाळी हवेमुळे काहीवेळा थोडे जास्त खाल्ले तर ते पचत नाही. त्यातही पुरेशी झोप झाली नसेल तर खाल्लेले अजिबात पचत नाही. मात्र तरीही मोदक आवडतात म्हणून आणि सगळ्यांसोबत थोडं जास्त खाणं होतंच. जास्तीच्या खाण्याने पोटाला त्रास होऊ नये आणि पचनक्रिया सुरळीत राहावी यासाठी काही गोष्टी अवश्य करायला हव्यात. पाहूयात हे उपाय कोणते आणि ते नेमके कसे करायचे (Had heavy lunch on Ganesh Chaturthi then follow 4 tips for better health ). 

१. १. हलके चालणे

१० मिनीटे हलके चालायला हवे, यामुळे अन्न पुढे सरकण्यास मदत होते आणि पचनक्रियेला ताण पडत नाही. अशावेळी तुम्ही घरातल्या घरात चालू शकता नाहीतर घराबाहेरही चालायला जाऊ शकता. पण जेवणानंतर खूप खाल्ले म्हणून चालतच बसलो असे करु नका तर हे चालणे अगदी १० मिनिटांचे आणि कमी वेगाने असायला हवे अन्यथा त्याचाही त्रास होऊ शकतो. जोरजोरात जास्त वेळ चाललो तर मळमळ आणि पोटदुखी असे त्रास उद्भवू शकतात. 

२. बडीशेप किंवा चूर्ण घ्या

पूर्वीच्या काळी जेवळ झाले की बडीशेप, सुपारी अशा गोष्टी खाण्याची पद्धत होती. खाल्लेले अन्न पचण्यासाठी हा एक उत्तम उपाय असतो. तुम्हाला कोणत्या प्रकारचे चूर्ण किंवा बडीशेप आवडते त्याप्रमाणे तुम्ही ते खाऊ शकता. सुपारीविना सुपारी खाल्ली तरी अन्न पचण्यास मदत होते. त्यानंतर थोडे कोमट पाणी प्यायल्यास पोट हलके राहते. 

३. लगेचच आडवे होऊ नका

जास्त जेवण झाल्यानंतर लगेचच आडवे होऊ नका. तुम्हाला जास्त जेवल्यामुळे काहीसे अस्वस्थ वाटण्याची शक्यता असते. अशावेळी लगेच आडवे झाल्यामुळे शरीरात अॅसिड रिअॅक्शन होऊ शकते. यामुळे तुमच्या पचनसंस्थेवर ताण येईल आणि तुम्हाला मळमळ झाल्यासारखे वाटेल. त्यामुळे आडवे होण्यापेक्षा चाला नाहीतर शांत बसा. 

४. रात्री हलका आहार घ्या

दुपारी खूप जास्त जेवण झाले तर रात्रीच्या वेळी हलका आहार घ्यायला हवा. यामध्ये मूगाच्या डाळीची खिचडी, दहीभात, ताक भात असे पदार्थ खाऊ शकता. रात्री पचनशक्ती क्षीण झालेली असते अशावेळी हलका आहार घेतल्यास पोटावर ताण येणार नाही. 

Marathi News
[pj-news-ticker]
Browse by category:

Kolhapur

Maharashtra

National

International

Entertainment

Sports

Health

Lifestyle

Browse by brands: