Source: Sakal Kolhapur
गर्भाशयमुख कॅन्सर प्रतिबंधक लसीकरण शिबिर रविवारी कोल्हापूर, ता. ४ ः कॅन्सर पेशंट असोसिएसन आफ इंडीयाचे डॉ. धनंजय सारनाथ, यशोमंगल चॅरीटेबल ट्रस्टच्या डॉ. राधिका जोशी, हिरकणी ग्रुपच्या जयश्री शेलार यांच्या विशेष सहकार्याने रविवारी (ता.२१) ९ ते २० वयोगटातील मुलींसाठी मोफत गर्भाशय मुखाच्या कॅन्सर प्रतिबंधक मोफत लसीकरण शिबिर होणार आहे. कोल्हापूर मेडीकल असोसिएशन बेलबाग येथे सकाळी ८ ते २ या वेळेत शिबिर होईल. यासाठी इच्छुक मुलींनी पूर्वनाव नोंदणी यशोमंगल क्लिनिक न्यु महाद्वार रोड येथे करता येणार आहे. मुलींनी लस घेण्यासाठी पालकांची पूर्व परवानगी घेणे तसेच आधार कार्डासोबत समक्ष भेट देऊन नावनोंदणी करता येणार आहे, अशी माहिती डॉ. जोशी यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.