Source: Sakal Kolhapur
01483अवनि बराले01484दैवता दिंडे01485वैष्णवी चोपडे
मिशन ऑलिम्पिक स्पर्धेतवडणगेच्या खेळाडूंचे यशसकाळ वृत्तसेवावडणगे, ता. २ : येथील १७ खेळाडूंची २५ व २६ फेब्रुवारीला खोपोली येथे झालेल्या मिशन ऑलिम्पिक नॅशनल स्केटिंग चॅम्पियनशिपसाठी निवड झाली होती. या स्पर्धेत आठ वर्षे वयोगटात मुलींमध्ये-अवनि प्रवीण बराले, नऊ वर्षे वयोगटात वैष्णवी सुशील चोपडे व ११ वर्षे वयोगटात दैवता बाजीराव दिंडे या तीन खेळाडूंना कांस्य पदक मिळाले. या तिघींची आंतरराष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेसाठी थेट निवड झाली. खोपोलीतील स्पर्धेत आरुष साखळकर, निधी लोखंडे, वीरा ठमके, तनिष्का मिसाळ, जयेश चौगले, फरमान शेख, अर्हत माने, राजनंदिनी माने, अमेय पाटील, वैष्णवी चोपडे, जोधा शिंदे, सिद्धेश पाटील, भक्ती कुंभार, अनुष्का यादव यांची विविध गटात निवड झाली होती. स्केटिंग प्रशिक्षक प्रदीप मोरे यांचे त्यांना मार्गदर्शन मिळाले.