fbpx
Site logo

‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’मधील ही अभिनेत्री कलाविश्वापासून आहे दूर, लूकमध्ये झालाय मोठा बदल

Facebook
LinkedIn
WhatsApp
अभिनेत्रीचे चाहते तिच्या कमबॅकची वाट पाहत आहेत.

Source: Lokmat Manoranjan

‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’ (Maziya Priyala Preet Kalena) या मालिकेतून अभिनेत्री मृणाल दुसानिस (Mrunal Dusanis) घराघरात पोहचली. मृणालने काही मालिकेत काम केल्यानंतर आता ती कलाविश्वापासून दुरावली आहे. सध्या ती तिच्या नवऱ्यासोबत परदेशात राहते आहे. भलेही ती कलाविश्वात सक्रीय नसली तरी ती सोशल मीडियावरुन आपल्या चाहत्यांना अपडेट देत असते. मृणाल एका मुलीची आई असून तिचं नाव नुर्वी आहे. मृणाल सोशल मीडियावर नुर्वीचे फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते. त्यांच्या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसते. दरम्यान आता मृणालने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत तिच्यात खूप बदल झाल्याचा पाहायला मिळत आहे.

अभिनेत्री मृणाल दुसानिस हिने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत अभिनेत्री पती आणि लेकीसोबत एन्जॉय करताना दिसत आहे. तिने हा व्हिडीओ शेअर करत लिहिले की, न्यूयॉर्कमधील ग्रॅण्ड सेंट्रल स्टेशन. अशी जागा जिथे सर्व सुंदर अनोळखी लोक एकमेकांना भेटतात. मृणालच्या या व्हिडीओला चाहत्यांची खूप पसंती मिळत आहे. मात्र या पोस्टवर चाहते कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. मात्र मृणालचे चाहते तिला खूप मिस करत असल्याचे सांगताना दिसत आहेत.

चाहते पाहताहेत अभिनेत्रीच्या कमबॅकची वाटया पोस्टवर कमेंट करताना एका चाहतीने लिहिले की, मृणाल, तू हे बरं नाही केलंस हं!!! आपल्या असंख्य चाहत्यांना वार्या वर सोडून भुर्रकनऊडून सातासमुद्रापलिकडे निघून गेलीस व आम्ही एका ऊत्कृष्ट अभिनेत्रीच्या चांगल्या कलाकृतींना मुकलो!!! एवढ्यावरच न थांबता, न्युयॉर्कहून सुंदर सुंदर फोटो पाठवुन आम्हास जळवण्याचे काम करतेस, आमच्या जखमांवर मीठ चोळण्याचाच प्रकार नाही कां हा?? दुसऱ्या युजरने लिहिले की, मृणालजी तुमच्यासारखे मुरब्बी कलाकार आता नाही दिसत. अस्सं सासर आणि सुखांच्या सरींनी सारख्या मालिकाही आता दिसत नाहीत. नवीन प्रोजेक्ट घेऊन लवकर या. माधुरी दीक्षित आल्या ना परत तशाच तुम्ही या आणि आम्हाला निखळ आनंद द्या. 

Marathi News
[pj-news-ticker]
Browse by category:

Kolhapur

Maharashtra

National

International

Entertainment

Sports

Health

Lifestyle

Browse by brands: