Source: Sakal Kolhapur
3487दोनवडे ः येथे बुधवारी दुपारी झालेल्या अपघातात एसटी खाली सापडलेली दुचाकी.3487अरुंधती पाटील
दोनवडेत बसखाली सापडून कुडित्रेची महिला जागीच ठारपती जखमी; बाजार करून परतताना दुर्घटनाकुडित्रे, ता. ३ ः भरधाव एसटी बसने दुचाकीला जोराची धडक दिल्याने कुडित्रे (ता. करवीर) येथील महिला चाकाखाली चिरडून जागीच ठार झाली. अरुंधती बाळासाहेब पाटील (वय ४८, रा. कुडित्रे) असे त्यांचे नाव आहे. त्यांचे पती बाळासाहेब आकाराम पाटील (५२) गंभीर जखमी झाले आहेत. कोल्हापूर ते गगनबावडा मार्गावर वाकरे आणि दोनवडे (ता. करवीर) दरम्यान तीव्र उतारावर दुपारी एकच्या दरम्यान अपघात झाला. करवीर पोलिसांनी दिलेली माहिती अशी ः बाळासाहेब पाटील व त्यांचे भाऊ सुनील अभियंते आहेत. ते अबुधाबी येथे पाच वर्षे नोकरी करतात. त्यांची मुले पुणे येथे शिक्षण घेत आहेत. ते, शनिवारी (ता. ६) दोघे भाऊ अबुधाबीला परतणार होते. बुधवारी बाळासाहेब व त्यांच्या पत्नी अरुंधती खरेदीसाठी कोल्हापूरला गेले होते. तेथून दुचाकी (एमएच ०९ एफए- ३४००) वरून गावी परतत होते. त्याचवेळी देवगड ते तुळजापूर एसटी बस (एमएच २० – बीएल २९११) गगनबावडा मार्गावरून कोल्हापूरकडे निघाली होती. बस वाकरेच्या पुढे दोनवडे येथे तीव्र उतारावर आली. त्यावेळी चालकाचा ताबा सुटल्याने बसची पाटील दाम्पत्याच्या दुचाकीला जोराची धडक दिली. यात अरुंधती बसच्या चाकाखाली चिरडल्याने जागीच ठार झाल्या. पती बाळासाहेब यांच्या पायाला व हाताला गंभीर दुखापत झाल्याने ते बेशुद्ध पडले. नागरिकांनी बाळासाहेब यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. घटनास्थळी काही वेळ वाहतुकीची कोंडी झाली. बसचालक महेंद्र पाटील पोलिस ठाण्यात हजर झाले.
कमानपाटा तुटला; पण…एसटी बसचा चालकाच्या बाजूकडील कमानपाटा तुटल्याने बस एका बाजूला ओढली गेली. त्यामुळे अपघात झाल्याचा दावा एसटी महामंडळातर्फे घटनास्थळी करण्यात आला आहे. अपघातानंतर एसटी व्यवस्थित कोल्हापूरला कशी नेली गेली, असा प्रश्न घटनास्थळी नागरिकांतून उपस्थित केला.००००००००००००००ओळीदोनवडे ः येथे बुधवारी दुपारी झालेल्या अपघातात एसटी खाली सापडलेली दुचाकी.दुसऱ्या फोटोत मृत महिला अरुंधती पाटील.