Source: Sakal Kolhapur
02315हुपरी: चंद्राबाई शेंडूरे महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना बेटी बचाव अभियानप्रसंगी प्रा. डॉ. अक्षता गावडे यांनी मार्गदर्शन केले. प्राचार्य प्रा. डॉ. डी. आर. भोसले आदी उपस्थित होते.———–महिलांवर वाढता अत्याचार चिंताजनकडॉ. अक्षता गावडे; शेंडूरे महाविद्यालयात ‘युवती आणि आजचा समाज’वर मार्गदर्शनहुपरी, ता.३ : सध्याच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात महिलांवर वाढता अत्याचार चिंताजनक आहे. अशा स्थितीत युवावर्गाने ‘बेटी बचाव अभियान’ समजून घेऊन ते जबाबदारीने राबवले पाहिजे. समाजामध्ये स्त्री-पुरुष समानता रुजवण्याच्या दृष्टिकोनातून काम केले पाहिजे तरच खऱ्या अर्थाने स्त्री सबल होईल, असे मत प्रा. डॉ. अक्षता गावडे यांनी येथे व्यक्त केले.रयत शिक्षण संस्थेच्या येथील चंद्राबाई शेंडूरे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना, समाजशास्त्र विभाग आणि तक्रार निवारण समितीतर्फे बेटी बचाव अभियान अंतर्गत आयोजित ‘युवती आणि आजचा समाज’ या विषयावर त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य प्रा. डॉ. डी. आर. भोसले होते. उपप्राचार्य प्रा. डॉ. सुनील चंदनशिवे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक समाजशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. एस. डी. सूर्यवंशी यांनी केले. आभार प्रा. डॉ. विजय घेजी यांनी मानले. सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. संध्या माने यांनी केले.