fbpx
Site logo

महावितरण प्रशिक्षण

Facebook
LinkedIn
WhatsApp

Source: Sakal Kolhapur

महावितरणकडून कृषीपंप ग्राहकांना प्रशिक्षण

कोल्हापूर : महावितरणकडून कदमवाडी उपविभागातील निगवे गावातील कृषीपंप ग्राहकांना कपॅसिटर बसविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. कपॅसिटर बसविल्याने कृषीपंपांना योग्य दाबाचा वीज पुरवठा मिळण्यास मदत होऊन विद्युत पंप व विद्युत रोहित्रे जळणे वा नादुरूस्त होण्याचे प्रमाण कमी होणार आहे. कृषीपंप ग्राहकांच्या वीज बिलात बचत होईल. कार्यक्षम वीज वापरासाठी बहुपयोगी कपॅसिटरचा वापर कृषिपंप ग्राहकांनी करावा, या हेतूने प्रशिक्षण देण्यात आले. निगवेतील ५० कृषी पंप ग्राहकांनी कपॅसिटर प्रशिक्षणाचा लाभ घेतला. उपविभागीय अभियंता गणेश पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली शाखा अभियंता विवेक लाटकर यांनी प्रशिक्षण दिले.

Marathi News
[pj-news-ticker]
Browse by category:

Kolhapur

Maharashtra

National

International

Entertainment

Sports

Health

Lifestyle

Browse by brands: