महापालिकेला द्यावी लागणार तीन कोटीवर भरपाई

Share on facebook
Facebook
Share on linkedin
LinkedIn
Share on whatsapp
WhatsApp

Source: Sakal Kolhapur

महापालिकेला भरावे लागणार तीन कोटीसुभाष स्टोअर प्रदूषणप्रश्‍नी राष्ट्रीय हरित लवादाचा अंतिम निर्णय

कोल्हापूर, ता. २२ ः परवानगी न घेता चालवलेल्या सुभाष स्टोअरमधील सांडपाण्याने झालेल्या पंचगंगा नदीच्या प्रदूषणासाठी महापालिकेला तीन कोटीच्या आसपास रक्कम भरावी लागणार आहे. २०१६ ते डिसेंबर २०२१ पर्यंत दोन कोटी २८ लाखांची रक्कम महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने निश्‍चित केली आहे. ती अंतिम करत मंडळाकडून स्टोअरची परवानगी मिळत नाही, तोपर्यंत भरपाई वसूल करावी असे आदेश राष्ट्रीय हरित लवादाने दिल्याची माहिती ॲड. ओमकार वांगीकर यांनी ‘सकाळ’ ला दिली. याशिवाय परवानगी घेतली नसल्याबद्दल ३० लाखांचा वेगळा दंडही भरावा लागणार आहे. ही सारी रक्कम पंचगंगा प्रदूषणमुक्तीसाठीच वापरावी असेही म्हटले आहे.महापालिकेच्या वाहनांची दुरूस्ती देखभालीसाठी सुभाष स्टोअर सुरू केले. त्याची सुरूवात १९७२ च्या आसपास झाली तरी त्यावेळी त्याचे कामकाज कमी होते. त्याला प्रदूषण नियंत्रण मंडळाची परवानगी नाही. त्यातून बाहेर पडणाऱ्या सांडपाण्याने पंचगंगा नदीचे प्रदूषण झाल्याची याचिका तानाजी रूईकर यांनी लवादाकडे दाखल केली होती. त्याची आज अंतिम सुनावणी होऊन युक्तिवाद पूर्ण झाला. तसेच लवादाने निर्णयही दिल्याचे रूईकर यांचे वकील ॲड. वांगीकर यांनी सांगितले.वेळोवेळी झालेल्या सुनावणीनंतर लवादाने काही आदेश मंडळाला दिले होते. सुभाष स्टोअरमधून केव्हापासून प्रदूषण झाले. त्यानुसार भरपाईची रक्कम निश्‍चित करण्यास सांगितले होते. २९१६ मध्ये पर्यावरण कायदा अस्तित्वात आला तेव्हापासून डिसेंबर २१ पर्यंतची मंडळाने रक्कम काढली. त्यानुसार गेल्या महिन्यात मंडळाने दोन कोटी २८ लाख रूपयांची भरपाई भरावी असे पत्र महापालिकेला दिले होते. याशिवाय १९८२ पासून परवानगी न घेता स्टोअर सुरू केल्याबद्दल ३० लाखांचा दंडही होता. याबाबत आज झालेल्या सुनावणीत चर्चा झाली. मंडळाने निश्‍चित केलेली रक्कम लवादाने अंतिम केली. महापालिकेने २०२२ मध्ये परवानगी मागितली आहे. त्यामुळे डिसेंबर २०२१ पासून जोपर्यंत परवानगी मिळत नाही, तोपर्यंत भरपाईची रक्कम निश्‍चित करावी व ती सर्व रक्कम वसून करावी, असेही आदेश लवादाने दिल्याचे ॲड. वांगीकर यांनी सांगितले. मंडळाने ज्या कालावधीसाठी २ कोटी २८ लाखाची रक्कम निश्‍चित केली. त्यानुसार डिसेंबर २०२१ पासून जोपर्यंत परवानगी मिळत नाही, त्या कालावधीपर्यंतची रक्कम वाढणार आहे. ही सारी रक्कम तीन कोटींच्या घरात जाण्याची शक्यता आहे. याबाबत महापालिकेच्या पर्यावरण अभियंत्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही.

चौकटमहापालिकेने मागवले होते मार्गदर्शनमंडळाने २ कोटी २८ लाखांची रक्कम निश्‍चित केल्यानंतर महापालिकेने ही आकडेवारी कोणत्या आधारे निश्‍चित केली याचे मार्गदर्शन मंडळाकडून मागवले होते. आत्ता तिथे केले जात असलेले काम व पूर्वीच्या कामात फरक होता असे महापालिकेचे मत होते. मंडळाने दिलेली आकडेवारी लवादाने अंतिम केल्याने त्याबाबतचा विचार लवादाने केला नसल्याचे दिसते.

चौकटपंचगंगा प्रदूषणमुक्तीसाठी वापरामहापालिकेला भरावी लागणारी रक्कम पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठीच वापरावी अशी विनंती ॲड. वांगीकर यांनी लवादासमोर केली. त्यानुसार लवादानेही तसे आदेश दिले असल्याचे वांगीकर यांनी सांगितले. त्यामुळे प्रदूषण रोखण्यासाठी आणखी काही उपाययोजना करणे शक्य होणार आहे.

eZy News
LATEST
>>गुंडाचा डोक्यात दगड घालून खून>>आजरा येथे जुगार आड्यावर छापा.>>झुलन गोस्वामीची अखेरची लढत>>Lumpy skin disease : लम्पी स्कीनप्रकरणी उच्च न्यायालयात जनहित याचिका>>कागल : राष्ट्रवादी पक्षाची विजयाची नांदी – आमदार हसन मुश्रीफ>>चंदगडी हिसका दाखवू>>शिराळा : विश्वास कारखाना वार्षिक सभा>>राक्षीतील घरफोड्याला अटक; वाघबीळ घाटात कारवाई, घरफोडीतील सोन्या-चांंदीचे दागिने जप्त>>शिक्षणाचा खेळखंडोबा होऊ देणार नाही – मंत्री केसरकर>>गांधी समजून घेताना>>कोल्हापूरला जयपूर करू -नुतन पालकमंत्री दीपक केसरकर>>म.ह. शिंदे महाविद्यालय>>जातिविहीन व्हा, उच्चनिचतेच्या भिंती जमीनदोस्त करा”>>अन्नपुर्णा’ शुगरचा सोमवारी द्वितीय गळीत हंगाम शुभारंभ>>‘सीबीआय’ कडून कागलमधील तरुणाची चौकशी>>लम्पी>>लव्हटे परिसंवाद>>कोजिमाशिची आज वार्षिक सभा>>नवरात्रोत्सव>>६५ हजारांचे दागिने जप्त
Browse by category:

Kolhapur

Maharashtra

National

International

Entertainment

Sports

Health

Lifestyle

Browse by brands: