Source: Sakal Kolhapur
महात्मा गांधी वसतीगृहात प्रवेश सुरुचंदगड ः येथील खेडूत शिक्षण मंडळाच्या महात्मा गांधी वसतीगृहामध्ये २०२३-२४ या शैक्षणिक वर्षासाठी मोफत प्रवेश सुरु आहेत. पाचवी ते दहावीत शिकणाऱ्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या व विमुक्त जमाती, विशेष मागास वर्ग तसेच आर्थिक मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश दिला जातो. अर्जासोबत जातीचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, रहिवाशी दाखला, आधार कार्ड झेरॉक्स व पासपोर्ट साईज फोटो आवश्यक आहे. इच्छुकांनी संपर्क साधावा, असे आवाहन वसतीगृहाचे अध्यक्ष एल. डी. कांबळे, आर. जी. साबळे यांनी केले आहे.