Source: Sakal Kolhapur
मलिग्रेची महालक्ष्मी यात्रा शुक्रवारपासूनतीन दिवस विविध कार्यक्रम; चौदा वर्षानंतर आयोजनमहागाव, ता. ३: तब्बल चौदा वर्षानंतर मलिग्रे – कागिनवाडी (ता. आजरा) येथे श्री महालक्ष्मी व चाळोबा देवाची यात्रा होत आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांसह, मनोरंजन कार्यक्रम, शर्यती, धावणे व महिलांसाठी होम मिनिस्टर कार्यक्रम होणार आहे. धार्मिक कार्यक्रमानतंर शुक्रवार (ता. ५) ते रविवार (ता.७) श्री महालक्ष्मी व चाळोबा देवाची यात्रा होणार आहे. शुक्रवारी रात्री लक्ष्मी खेळवणे व मिरवणूक होणार आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी शनिवारी ओटी भरण्याचा कार्यक्रम व रविवारी श्री चाळोबा देवाची यात्रा होणार आहे. गुरूवारी महिलांसाठी होम मिनिस्टर कार्यक्रम होईल. शुक्रवारी सकाळी मुले व मुलींसाठी धावणे, दहा वाजता डॉग रेस व सायकल स्पर्धा होईल. शनिवारी सकाळी दहा वाजता रस्सीखेच स्पर्धा, दुपारी गावगणना बैलगाडी, घोडागाडी, नवथर घोडागाडी, पाडा बैल शर्यत व सायंकाळी जनरल बैलगाडी शर्यत होणार आहे. रविवारी रात्री मनोरंजनात्मक वैभव ऑकेस्ट्रा होणार आहे.