Archives

मलकापूर अर्बन बँकेची वार्षिक सभा खेळीमेळीत

मलकापूर : मलकापूर येथील मलकापूर अर्बन बँकेची ५७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाईन पद्धतीने बँकेच्या सभागृहात पार पडली. सभासदांना १० टक्के लाभांश जाहीर करण्यात आला. प्रारंभी बँकेचे अध्यक्ष अजय लोध, जिल्हा बँकेचे संचालक सर्जेराव पाटील यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. उपाध्यक्ष बाळासाहेब गद्रे यांनी श्रद्धांजली ठराव मांडून मृत सभासदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. जनरल मॅनेजर राजेंद्र जोशी यांनी नोटीस वाचन केले. अध्यक्ष अजय लोध, संचालक नंदकुमार कोठावळे यांनी सभासदांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. सभासद उद्योजक बाबुराव सागावकर यांनी बँकेच्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केले. सभेसाठी नगराध्यक्ष अमोल केसरकर, गुलाब भटारी, गिरीष बाष्टे, अतुल भिंगार्डे, भीमराव सनगर, सागर पाटील, संजय भोपळे, रजिता वारंगे, राजश्री मगर, प्रकाश शिरगावकर, अनंत शेंडे आदी उपस्थित होते.Open in app

Comments

mood_bad
  • No comments yet.
  • Add a comment
    • No products in the cart.