Source: Sakal Kolhapur
06227इचलकरंजी :१) लोणच्याच्या आंब्याची विक्री बाजारात सुरू झाली आहे.06228२) बाजार समितीत मराठवाडा भागातून कोथींबीरची आवक होत आहे.—भाज्यांचे दर लागले कडाडूकोथिंबीरची मराठवाड्यातून आवक; लोणच्याच्या आंब्याची नगावर विक्री सुरूइचलकरंजी, ता. ४ : भाज्यांचे दर कडाडू लागले आहेत. कर्नाटक, स्थानिक आवक फारच कमी झाल्याने आता मराठवाडा भागातून कोथींबीरची आवक होत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. मेथी, कोथींबीरच्या दराचा जोर का झटका ग्राहकांना बसत आहे. बीन्सचे दर कमालीचे वाढले आहेत. शेवग्याचेही दर वाढू लागले आहेत. लोणच्याच्या आंब्याची विक्री बाजारात सुरू झाली असून दर मात्र यंदा नगावर आहेत.लग्नसराईचे मुहूर्त सुरू झाल्याने फुलबाजार उजळून निघाला आहे. हार, तुरे, फुलांना मागणी जोमात आहेत. यामुळे दरात वाढ झाली असून निशिगंध, गुलाब तेजीत आहे. फळबाजारात कर्नाटकसह राज्याच्या कानाकोपऱ्यातून शहरात आंब्याची आवक सुरू झाली आहे. हापूससह पायरी, रायवळ, लंगडा, तोतापुरी, मलगवा, निलम, बंगाली आंबा, बदामी, केसर, खोबरी आंबा असे अनेक प्रकारचे आंबे विक्रीला आहेत. धान्यबाजारात धान्य, डाळींची आवक वाढत असून मागणी मात्र थंडावली आहे.प्रति किलो रूपये भाजीपाला : टोमॅटो- २० ते २५, दोडका- ५० ते ६०, वांगी- ३० ते ४०, कारली- ४० ते ५०, ढोबळी मिरची- ४० ते ५०, मिरची -४०ते ५०, फ्लॉवर- १५ ते २०, कोबी-१२ ते १५, बटाटा- २५ ते ३०, कांदा -१८ ते २०, पांढरा कांदा-२०ते २५, लसूण- ८०ते १००, आले- २०० ते २२०, लिंबू- २५०- ४०० शेकडा, गाजर -३० ते ४०, बीन्स- १४० ते १५०, ओला वाटाणा -३० ते ४०, चवळी शेंगा – ७० ते ८०, भेंडी- ६० ते ८०, काकडी- ४० ते ५०, गवार- ६० ते ८०, रताळे – ३० ते ४०, दुधी -३० ते ४०, कोथिंबीर- ३० , मेथी – २५ अन्य पालेभाज्या १५ ते १८ रूपये , शेवगा ५-१० रूपये नग.- – — – – -फुले : झेंडू – ४० ते ५०, निशिगंध- २५० ते २७०, गुलाब – २००, गलांडा- ६० ते ७०, शेवंती-१०० ते १२०.- – – — – – फळे : सफरचंद- १८० ते २००, संत्री – १०० ते १३०, मोसंबी- १०० ते १२०, डाळिंब- १०० ते १५०, चिकू-८० ते १२०, पेरु-३० ते १००, खजूर – १५० ते २००, द्राक्षे – ६० ते १००, कलिंगड -५५ ते ६०, पपई- ३० ते ५०, खजूर-१२० ते १६०, अननस -८० ते १००, मोर आवळा -८० ते १००, केळी- ४० ते ५० डझन, देशी केळी – ८० ते ९० डझन, किवी -१०० ते १२०, स्ट्रॉबेरी-५० ते ६० ( लहान बॉक्स), चिंच-१०० ते १४०, अंजीर – २००, प्रतिनग टरबूज ५० ते ६०.– -खाद्यतेल : सरकी -११० ते ११५, शेंगतेल – १८० ते १९०, सोयाबीन -११० ते ११५ , पामतेल -१०५ ते ११०, सूर्यफूल -१२० ते १३५ . ——- कडधान्य : हायब्रीड ज्वारी- ३५ ते ५५, बार्शी शाळू- ४०ते ५३, गहू- ३० ते ३८, हरभराडाळ -६४ ते ६६ , तुरडाळ- ११७ ते १२७ मुगडाळ- १०५ ते ११८ ,मसूरडाळ – ७८, उडीदडाळ- १००ते ११०, हरभरा- ५५ ते ५८ मूग- ९४ ते १०५, मटकी- १२५ ते १३०, मसुर- ७०, फुटाणाडाळ -७० ते ७२, चवळी- ७५ ते ८३ , हिरवा वाटाणा- ५५, छोला -१२५ ते १४०.- – – – – – – – – – – -आले दुप्पटीने तिखटमागील आठवड्यापासून आल्याचे भाव वाढतच होते. या आठवड्यात आवक कमी झाल्याने आल्याच्या दराने उंची गाठली. ८० ते १०० रुपये प्रतिकिलो असणारे भाव आता २०० रुपयांवर गेला आहे. ५० रुपये पावशेर असा दर मिळत आहे. दुप्पटीने वाढलेले दर विक्रेते आणि ग्राहक दोघांनाही तिखटदायक ठरत आहेत. आवक वाढल्यास दर आटोक्यात येवू शकतात.
—–