Source: Sakal Kolhapur
99700कोल्हापूर : लक्ष्मीपुरी मंडईत भाज्यांची आवक भरपूर होती
99710दुसऱ्या छायाचित्रात आगळेवेगळे असे कोकणातील जाम फळ लक्षवेधून घेत आहे.
रताळे, हिरवा वाटाणा आला मंडईत पालेभाज्या, फळभाज्यांचे दर स्थिर; कोकणातील जाम फळही दाखल
सकाळ वृत्तसेवाकोल्हापूर, ता. ३० : काही भाज्या विशिष्टवेळीच मंडईत येतात. या आठवड्यात मात्र काही भाज्यांबाबत अपवाद झाला. रताळे, हिरवा वाटाणा मंडईत आला. पण, रताळे, वाटाण्याचे प्रमाण कमी होते. रताळे येतात ती बेळगाववरून तर हिरवा वाटाणा उत्तर कर्नाटकातून येतो. काळ्या घेवड्याची आवकही अशीच असते. कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकरी ज्या काही भाज्या आणतात, त्या भाज्या घेऊन विक्रेते मंडईत येतात. त्यामुळे भाज्यांचा असा अपवाद तयार होतो. अन्य पालेभाज्या, फळभाज्यांचे दर स्थिर आहेत. आवकही तुलनेने भरपूर आहे. कोकणात मिळणारे जाम नावाचे फळही विक्रीला आले आहे. प्रथम हे फळ पाहिले की, लाल रंगांचे काजूचे फळ आहे, असे दिसते; पण ते चविला गोड आहे. शिवाय जाममध्ये बारीक बिया असून, गर भरपूर असतो. …चौकटफळभाजी दर (प्रतिकिलो रुपये) काळा घेवडा *८०रताळे *४०हिरवा वाटाणा *१००हिरवी वांगी *४० फ्लॉवर *२०कोबी *५/१० दोडका *४०भेंडी *४०हिरवी मिरची *५०जवारी गवारी *३० रुपये पावशेर लाल बीट *१० रुपये एक नग शेवगा *१० रुपयाला तीन पेड्या ढब्बू मिरची *४० वरणा *५० कारले *४० वाल शेंग *४० काटे काकडी *२० हेळवी कांदा *१५/२० बटाटा *२० दूधी भोपळा *१० रुपयाला एक नग आल्ले *५० कच्ची केळी *४०/५० रुपये डझन लाल भोपळा *४० मक्का कणीस *१० रुपयाला एक नग कर्नाटकी भाजीचा कोहळा *८०/१०० रुपये नग सुरण गड्डा *८० आळू गड्डा *८० …चौकट पालेभाज्यांचे दर (प्रतिपेंडी) मेथी *२० लाल माट *१० तांदळी *१० शेपू *१० चाकवत *१० कोथींबीवर *२० कांदापात *१५ ाआंबाडा *१० आंबट चुका *१० पालक *१० … ठळक चौकटसोने-चांदीचे दर (प्रतितोळा /प्रतिकिलो) (रविवारी सायंकाळी साडेपाच पर्यंत घेतलेले दर) सोने *६२, ०७५ प्रतितोळा चांदी *७६, २०० प्रतिकिलो