fbpx
Site logo

भाजपाला आणखी एका मित्राची साथ मिळणार; दक्षिणेत राजकीय समीकरण किती बदलणार?

Facebook
LinkedIn
WhatsApp
चिकबल्लापूर लोकसभा जागा वगळता इतर ४ जागांवर ज्याठिकाणी देवगौडा अथवा त्यांच्या कुटुंबातील कुठला ना कुठला सदस्य निवडणुकीच्या मैदानात उतरला आहे.

Source: Lokmat National

नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीपूर्वी प्रमुख राजकीय पक्ष सत्तेची समीकरणे जुळवण्याचा प्रयत्न करत आहेत. राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि विरोधी आघाडी INDIA दोन्हीही आपापला विस्तार करत आहेत. विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या पराभवानंतर भारतीय जनता पार्टीनं आता कर्नाटकावर विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. कर्नाटकात काँग्रेस सरकार आहे. भाजपा दक्षिणेतील प्रवेशद्वारात पुन्हा शिरकाव करण्यासाठी प्रयत्नशील आहे.

भारतीय जनता पार्टी आणि जनता दल सेक्यूलर यांच्यात आघाडीची चर्चा सुरू आहे. एका वृत्तानुसार, जेडीएस प्रमुख एचडी देवगौडा यांची आघाडीबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपा अध्यक्ष जे.पी नड्डा यांच्याशी भेटही झाली आहे. जेडीएससोबत युतीवर प्राथमिक चर्चाही पार पडली. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा म्हणाले की, देवगौडा आमच्या पंतप्रधानांना भेटले त्याचा आनंद आहे. जेडीएसकडून ५ जागा मागितल्या जात आहेत. त्यात जेडीएस मांड्या, हासन, तुमाकुरू, चिकबल्लापूर आणि बंगळुरू ग्रामीण या जागेसाठी जेडीएस आग्रही आहे.

चिकबल्लापूर लोकसभा जागा वगळता इतर ४ जागांवर ज्याठिकाणी देवगौडा अथवा त्यांच्या कुटुंबातील कुठला ना कुठला सदस्य निवडणुकीच्या मैदानात उतरला आहे. मांड्या लोकसभा जागेवर २०१९ मध्ये माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांचे चिरंजीव निखील कुमारस्वामी, तुमकुर जागेवरून स्वत: एचडी देवगौडा, हासन जागेवरून नातू प्रज्वल रेवन्ना हे उमेदवार होते. बंगळुरू ग्रामीण जागेवर २०१४ मध्ये निवडणुकीत एचडी कुमारस्वामी यांची पत्नी अनिता कुमारस्वामी उमेदवार होत्या. या सर्व जागा वोक्कालिगा समुदायाची ताकद असलेले मतदारसंघ आहेत.

भाजपा-जेडीएस युतीने काय समीकरणं बदलणार?

भाजपा आणि जेडीएस जर एकत्र आले तर दक्षिण भारतातील या राज्यात सामाजिक आणि राजकीय समीकरण पूर्णत: बदलतील. कर्नाटकातील लोकसंख्येच्या १७ टक्के हिस्सा असलेला लिंगायत समाज भाजपाचा पारंपारिक मतदार मानला जातो. माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा हे लिंगायत समुदायातून येतात. तर लिंगायत समुदायानंतर १५ टक्के लोकसंख्या असलेला वोक्कालिगा समुदाय दुसरा प्रभावशाली समाज आहे. वोक्कालिगा समाज पारंपारिक जेडीएसचा मतदार मानला जातो.

त्यामुळे भाजपा-जेडीएस एकत्र आल्यास एनडीएच्या पारड्यात ३० टक्क्याहून अधिक मतदान होऊ शकते. परंतु आघाडीच्या स्थितीत या दोन्ही पक्षाच्या मतदारांची किती मते एकमेकांना पडतील हा वेगळा विषय आहे. परंतु सामाजिक आणि प्रादेशिक राजकीय समीकरणात एनडीएला ताकद मिळू शकते. आता प्रश्न असा आहे की, कर्नाटकात स्वबळावर सरकार चालवणाऱ्या भाजपाला लोकसभा निवडणुकीपूर्वी जेडीएसची मदत का घ्यावी लागली? त्याचे उत्तर २०२३ च्या निकालात आहे. २०२३ च्या निकालात कर्नाटकात भाजपाला ३६.३ टक्के मते मिळून ६६ जागांवर विजय मिळाला. काँग्रेसला ४३.२ टक्के मते पडून १३५ जागा मिळाल्या. जेडीएसला १९ जागा मिळाल्या परंतु पक्षाचे मतदान १३.४ टक्के इतके राहिले. मतांची टक्केवारी पाहिली तर भाजपा आणि काँग्रेस यांच्यात जवळपास ७ टक्के मतांचे अंतर आहे.

Marathi News
[pj-news-ticker]
Browse by category:

Kolhapur

Maharashtra

National

International

Entertainment

Sports

Health

Lifestyle

Browse by brands: