Archives

भाकरी मीच थापतोय; परतायची कधी हे चांगले कळते!

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : ‘गोकुळ’ दूध संघात यापूर्वी आणि आताही मीच भाकरी थापतोय, त्यामुळे ती कधी परतायची हे मला चांगले कळते. संघाची काळजी करण्यास आम्ही समर्थ असल्याचा पलटवार ‘गोकुळ’चे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी विरोधी संचालक शौमिका महाडिक यांच्यावर केला. ‘गोकुळ’ची ऑनलाईन वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवारी संघाच्या ताराबाई पार्क कार्यालयात झाली, त्यावेळी ते बोलत होते. संघाची सभेवेळी विरोधी संचालक बाळासाहेब खाडे, अंबरीष घाटगे, चेतन नरके हे वेळेवर उपस्थित राहिले होते. मंत्री हसन मुश्रीफ व मंत्री सतेज पाटील आल्यानंतर अध्यक्ष विश्वास पाटील यांनी प्रास्ताविकास सुरुवात केली. संघाचे गेल्या आर्थिक वर्षासह आगामी योजनांची माहिती देत असताना, विरोधी संचालिका शौमिका महाडिक तिथे आल्या. महाडिक यांना पाहून अध्यक्ष पाटील यांच्या बोलण्याचा रोखच बदलला. शौमिका महाडिक यांनी गुरुवारी केलेल्या आराेपाचा समाचार घेण्यास सुरुवात केली. संघावर ८२ कोटींच्या कर्जाचा आकडा कोणी काढला, संघाची काळजी करण्यास आम्ही समर्थ आहोत. सकाळीच एकाचा फोन आला, भाकरी परतणार की नाही? असे विचारले. मागील संचालक मंडळात आणि आताही मीच भाकरी थापतोय, त्यामुळे भाकरी केव्हा परतायची, हे मला चांगले माहिती आहे. कोणी काळजी करू नये, असे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी सांगितले. चार महिन्यांचा नव्हे, ३५ वर्षांच्या कारभारावर विश्वास‘गोकुळ’ला आज ‘एनडीडीबी’सह इतर वित्तीय संस्था कर्ज देण्यास तयार आहेत, हा संघावरील विश्वास आहे. हा विश्वास चार महिन्यांत नव्हे, तर गेली ३०-३५ वर्षे केलेल्या कामकाजामुळेच असल्याचा टोला शौमिका महाडिक यांनी पत्रकारांशी बोलताना लगावला. लेखापरीक्षणात ठपके नाहीत म्हणजे चांगला कारभारलेखापरीक्षण अहवालात कोणत्याही प्रकारचे ठपके नाहीत, म्हणजे ‘गोकुळ’चा मागील कारभार चांगलाच होता, हे सिध्द होते. यापुढेही असाच रहावा, असा टोला महाडिक यांनी लगावला. महाडिक यांचा मुश्रीफ यांना नमस्कार शौमिका महाडिक आल्यानंतर व्यासपीठावर बसलेले मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे पाहून त्यांनी नमस्कार केला. मंत्री मुश्रीफ यांनीही त्यांना नमस्कार केला. मात्र पालकमंत्री सतेज पाटील व महाडिक यांनी एकमेकांकडे ढुंकूनही पाहिले नाही.Open in app

Comments

mood_bad
  • No comments yet.
  • Add a comment
    • No products in the cart.