Source: Sakal Kolhapur
02333बोरपाडळेतील दूध उत्पादकाला मदतबोरपाडळे : येथील दूध उत्पादक धनाजी सीताराम जाधव यांची जनावरांच्या शेडमधील वैरण जळून नुकसान झाले होते. ते येथील सावित्री- विश्व महिला सहकारी दूध संस्थेचे उत्पादक आहेत. त्यांना सावित्री- विश्व महिला सहकारी दूध संस्थेकडून भरपाईपोटी दोन हजारांची मदत केली. यावेळी संस्थापक के. एस. पाटील, श्रीकांत लबडे, उदय निकम, अभिजित साळोखे उपस्थिती होते. शिवाजी बिरंजे, सुदीप पाटील, विलास निकम, पी. एस. पाटील, निवृत्ती माने-पाटील, दूध उत्पादक, कर्मचा-यांचे सहकार्य मिळाले.